शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी दुहेरी चौकशीच्या फेऱ्यात

By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST

उपसंचालकांमार्फत चौकशी : पालिकेमार्फत चौकशी अद्याप सुरूच

नाशिक : मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध अनेक तक्रारी गेल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी श्रीमती कुंवर यांची उपसंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश काढले असून, अगोदरच पालिका प्रशासनामार्फत सुरू असलेल्या चौकशीमुळे कुंवर या आता दुहेरी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या गैरवर्तणुकीबाबत शिक्षक संघटनांसह अनेक शिक्षकांनी महापालिका आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार डिसेंबर व जानेवारीत झालेल्या महासभांमध्ये विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी श्रीमती कुंवर यांच्या एकूणच कारभाराचे दर्शन विविध प्रकरणांद्वारे सभागृहाला घडविले होते. त्यानुसार आयुक्तांनी प्रशासनाधिकारी कुंवर यांची चौकशी करण्यासाठी प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत चौकशीचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे पालिका प्रशासनामार्फत चौकशी सुरू असतानाच आता विरोधीपक्ष नेत्यांच्या तक्रारीवरून शिक्षण संचालकांनी श्रीमती कुंवर यांची उपसंचालकांमार्फत चौकशीचे आदेश दिले असून, उपसंचालकांनी सदर चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करण्याची सूचना केली आहे. बडगुजर यांनी शिक्षण संचालकांना दिलेल्या निवेदनात शिक्षण मंडळातील गणवेश खरेदी प्रकरण, बेकायदेशीर शिक्षक भरती, तसेच सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले १६ शिक्षकांचे पगार, मुख्याध्यापक सौ. खांडेकर यांचे कारणे दाखवा नोटीस न बजावता केलेले निलंबन, उर्दू शिक्षकांना हजर करून न घेणे आदि तक्रारींचा ऊहापोह केलेला आहे. दरम्यान, पालिका प्रशासनामार्फत कुंवर यांची चौकशी झाली असून, आयुक्त विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्यापुढे चौकशी अहवाल ठेवला जाणार असल्याचे चौकशी अधिकारी विजय पगार यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)