अंध-अपंगांची महापालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:21 IST2019-11-13T00:21:06+5:302019-11-13T00:21:34+5:30

महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध-अपंगांनी गुरुवारी (दि.३१) महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली.

 Blind-handicapped hit the municipality | अंध-अपंगांची महापालिकेवर धडक

अंध-अपंगांची महापालिकेवर धडक

नाशिक : महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध-अपंगांनी गुरुवारी (दि.३१) महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी अंध-अंपगांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे, मात्र हा निधी खर्च केला जात नाही. गेल्या २०१६-१७ पासून हा निधी खर्च झालेला नाही. याबाबत दिव्यांग संघटनांच्या वतीनेदेखील महापालिकेला पत्रव्यवहार करून उपयोग झालेला नाही, असे दिव्यांग हक्क संघर्ष समितीचे म्हणणे असून, हा निधी खर्च करावा यासाठी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर धडक दिली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन आंदोलन टाळले आणि संघटनेचे निवेदन स्वीकारले. महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध योजना घोषित केल्या खºया, परंतु त्यातील अनेक नियम आणि अटी जाचक आहेत. त्यामुळे त्याचा लाभ दिव्यांगांना घेता येत नाही. स्वयंरोजगार योजनेतदेखील अटी जाचक असून त्याचा लाभ मिळूच शकत नाही, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे अटी-शर्ती शिथिल कराव्यात, अशी मागणी सचिन पानमंद, सुनील पवार, विजय गायकवाड, उत्तम फरताळे, शोभा शिंदे, प्रतीक सोनवणे, राधा आठवले, निवृत्ती केदारे, रूपेश भालेराव, किरण पाटील यांच्यासह अन्य दिव्यांगांनी केली आहे.

Web Title:  Blind-handicapped hit the municipality