शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिटको रुग्णालयात  रुग्णांचा ओघ सकाळीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:12 IST

मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत दोन तास बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला असून, त्याबाबत माहिती फलक लावला नसल्याने सकाळच्या ओपीडीवर रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत सायंकाळच्या ओपीडीमध्ये अत्यंत अल्प रुग्ण उपचारासाठी आले आहेत.

नाशिकरोड : मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत दोन तास बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला असून, त्याबाबत माहिती फलक लावला नसल्याने सकाळच्या ओपीडीवर रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत सायंकाळच्या ओपीडीमध्ये अत्यंत अल्प रुग्ण उपचारासाठी आले आहेत.  बिटको रुग्णालयामध्ये सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत ओपीडीचा वेळ आहे. तर ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी स्वतंत्र ओपीडी असूनल तेथील वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. सर्वांसाठी असलेल्या ओपीडीमध्ये दररोज ३०० हून अधिक व ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी असलेल्या ओपीडीमध्ये दररोज १०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बिटको रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करून सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर लागलीच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बिटको रुग्णालयात रुग्णाच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत २ तास ओपीडी विभाग सुरू करण्यात आला.सायंकाळी दोन तास ओपीडी सुरू असल्याबाबत माहिती फलक न लावल्याने रुग्णांना याची माहितीच झालेली नाही. त्यामुळे सकाळच्या ओपीडीवरील रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. सकाळच्या ओपीडीच्या वेळेला रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याने रुग्णांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे डॉक्टर, कर्मचारी यांच्यावरदेखील ताण वाढतो.  मात्र सायंकाळी सुरू झालेल्या ओपीडीबाबत रुग्ण, नातेवाईक अनभिज्ञ असल्याने सायंकाळी दोन तासाच्या ओपीडीमध्ये हातावर मोजण्या इतकेच रुग्ण उपचारासाठी येतात. सायंकाळी सुरू झालेली ओपीडी रुग्णांना माहीत झाल्यास सकाळच्या ओपीडीवरील भार हलका होईल. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात, ओपीडी विभागात ओपीडी सुरू व बंद होण्याच्या वेळापत्रकांचा माहिती फलक लावणे गरजेचे आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका