शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मैत्र दिनासाठी तरुणाई सज्ज : संडे ठरणार यादगार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 20:28 IST

‘तुझ्या मैत्रीविना आयुष्य धूसर, तुझी मैत्री प्रेमाचा अविरत पाझर’ अशा शब्दांमधून मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करणारा मैत्र दिन रविवारी (दि.६) अमाप उत्साहात साजरा करण्यास तरुणाई सज्ज झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘तुझ्या मैत्रीविना आयुष्य धूसर, तुझी मैत्री प्रेमाचा अविरत पाझर’ अशा शब्दांमधून मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करणारा मैत्र दिन रविवारी (दि.६) अमाप उत्साहात साजरा करण्यास तरुणाई सज्ज झाली आहे. मैत्र दिन रविवारी आल्याने अनायासे सुटी मिळाली असून, मित्र-मैत्रिणींनी हा दिवस यादगार बनवावा, या हेतूने कुणी छोटीशी पार्टी, कुणी लहान- मोठी पिकनिक, कुणी एखादा सिनेमा, नाटक तर कुणी फक्त एकत्र जमून मनसोक्त गप्पा मारण्याचे बेत ठरवले आहे. रविवार असल्याने आणि श्रावणात हिरवाईचे अनोखे वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी सोमेश्वर, गंगापूर डॅम, त्र्यंबकेश्वर, पहिने, जव्हाररोड, इगतपुरी आदी ठिकाणी छोटीशी ट्रीप करण्याचे नियोजन केले आहे. तर काही जणांनी एकत्र जमून हिंदी, मराठी चित्रपट पहाण्याचे नियोजनकेलेआहे.आपल्या जीवलग मित्र-मैत्रिणींना देण्यासाठी वैविध्यपूर्ण वस्तूंचीही खरेदी करण्यात आली असून, मैत्रीचा धागा असणारा फ्रेंडशिप बॅँड बांधून, गिफ्ट देऊन मैत्र दिवस साजरा केला जाणार आहे.मैत्र दिनानिमित्त रविवार पेठ, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, सिडको, नाशिकरोड आदी सर्व ठिकाणच्या दुकानांमध्ये भेटवस्तू, बॅँड यांचे प्रकार पहायला मिळत आहे. फ्रेंडशिप बॅँडमध्ये यंदा वैविध्यपूर्ण प्रकार बाजारात दाखल झाले असून लेदर, सॅटन, बीट्स, कॉटन आणि वूलनमधील आकर्षक बॅँड्सना तरुणाईची पसंती लाभत आहे. पारंपरिक टेडीबिअर, डॉगी, डॉल अशा सॉफ्ट टॉईज यांबरोबरच पर्सनलाज्ड किचेन्स, मग, मोबाइल कव्हर, ब्रेसलेट, घड्याळ, चेन, शोभेच्या वस्तू, टीशर्ट, ज्वेलरी आदी तºहेतºहेच्या वस्तू आपापल्या मित्र-मैत्रिणींना देण्याचे अनेकांनी ठरविले असून, शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याची खरेदी करण्याची लगबग बाजारपेठेत दिसून आली. मैत्र दिनानिमित्त सोशल मीडियावरही संदेश, इमेज यांचा पाऊसच पडलेला दिसून येत आहे. आपापल्या मित्र-मैत्रिणींना निरनिराळ्या माध्यमातून शुभेच्छा देत मैत्रीचे नाते घट्ट करण्यावर भर दिला जाणार आहे.