दुचाकीची चोरी

By Admin | Updated: September 16, 2014 00:28 IST2014-09-15T00:44:33+5:302014-09-16T00:28:46+5:30

दुचाकीची चोरी

Bike theft | दुचाकीची चोरी

दुचाकीची चोरी


नाशिक : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ विशाल शिवाजी कामडी (३२, गुलमोहोर कॉलनी, सातपूर) यांनी आपली हिरोहोंडा दुचाकी जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये लावलेली होती़ पंचवीस हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी दुचाकी चोरीची घटना जिल्हा रुग्णालयात घडलीक़ाठे गल्लीतील शशिकांत नारायण कुलकर्णी यांची हिरो होंडा (एमएच १५ सीसी ४०११) दुचाकी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली होती़ चोरट्यांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही दुचाकी चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Bike theft