शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांच्या कारागृह मुक्कामाने समता परिषद चिंतित : बैठक :

By admin | Updated: April 27, 2017 18:24 IST

ओबीसींची नव्याने जनगणना करण्याचा ठराव

नाशिक : अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईमुळे (ईडी) गेल्या वर्षभरापासून समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांचा कारागृहातील मुक्काम वाढल्याने त्यांच्या अनुपस्थितीने परिषदेच्या कामकाजावरही परिणाम होत असल्याने परिषदेच्या राज्य कार्यकारिणीत चिंता व्यक्त करण्यात आली. देशातील ओबीसींची नव्याने तातडीने जनगणना करून त्याची आकडेवारी घोषित करण्यात यावी, असा ठरावही या बैठकीत करण्यात आला. समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नगर येथे नुकतीच पार पडली. त्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. आघाडी सरकारच्या कालावधीत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना हाती घेतली होती. मात्र केंद्रात सरकार बदलल्यानंतर ओबीसींची जनगणना पूर्ण करण्यात आली नाही. विशेष म्हणजे देशतील एससी तसेच एसटी या प्रवर्गाची जनगणना सरकारने पूर्ण करून त्याची आकडेवारी घोषित केली. त्यामुळे देशातील ओबीसींची नव्याने जनगणना होऊन त्याची आकडेवारी तातडीने घोषित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुका पातळीपासून केंद्र सरकारपर्यंत निवेदन प्रसंगी आंदोलन करण्यात येऊन त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असा ठराव करण्यात आला.