शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भावली ग्रामस्थांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:46 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली गावाचे पुनर्वसन न करता यावर्षी धरणाचे गेट बंद केल्याने या गावात यावर्षी पाणी येणार असल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून घोटी येथे महामार्गावर सिन्नर फाटा येथे ठिय्या आंदोलन केले. मात्र सदर गावात पाणी जाऊ देणार नाही आणि ...

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली गावाचे पुनर्वसन न करता यावर्षी धरणाचे गेट बंद केल्याने या गावात यावर्षी पाणी येणार असल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून घोटी येथे महामार्गावर सिन्नर फाटा येथे ठिय्या आंदोलन केले. मात्र सदर गावात पाणी जाऊ देणार नाही आणि ग्रामस्थांना विस्थापित करण्यात नाही असे लेखी आश्वासन शासनाच्यावतीने देण्यात आल्यानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील खापरी नदीवर गेली दोन वर्षांपूर्वी वाकी खापरी धरण बांधण्यात आले आहे.या धरणात यावर्षी पूर्ण पाणी साठा करण्यात येणार असल्याने या धरणाचे गेट बंद करण्यात आले आहे.मात्र या गेट बंदला भावली ग्रामस्थांचा कडवा विरोध आहे. हे गेट बंद केल्याने गावात पाणी शिरणार असल्याने हे गेट तात्काळ उघडण्यात यावे अशी मागणी करूनही गेट उघडण्यात न आल्याने भावली ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली घोटी येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे निश्चित केले होते.दरम्यान आंदोलनाची दखल घेत इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरनाळे,धरणाचे कार्यकारी अभियंता केतन पवार,पिळोदेकर आण िग्रामस्थ यांची घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी घोटी पोलीस ठाण्यात बैठक घेतली.या बैठकीत धरणाच्या अधिकाऱ्यांनी सदर धरणाचे पाणी भावली गावात येऊ देणार नाही असे ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.दरम्यान आंदोलकांनी सिन्नर फाट्यावर ठिय्या मांडीत आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली.यावेळी घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी आंदोलकात आणि धरण अधिकारी, महसूल विभागाच्या अधिकाºयांमध्ये मध्यस्थी करीत हे आंदोलन मागे घेण्यासाठी सुवर्णमध्य काढला.  दरम्यान शासनाने योग्य आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले .या आंदोलनात श्रमजीवीचे राज्य सरचिटणीस विजय जाधव,सरचिटणीस भगवान मधे, संतोष ठोंबरे,तालुकाध्यक्ष संजय शिंदे,लता मेंगाळ, सुनील लोहरे, बाळू गावंडा,सीताराम गावंडा, शांताराम भगत,नीता गावंडा, तुकाराम खोडके,,यांच्यासह भास्कर पाचरणे, भगवान पाचरने,भावडू काळचिडे,अनुसया काळचिडे,लता बच्चे,तुकाराम बच्चे,तुकाराम शिंदे,कचरू पाचरने आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक