बेल्ट रेसलिंग स्पर्धेत भगुर, नांदगावच्या खेळाडूंचे वर्चस्व

By Admin | Updated: September 20, 2014 00:36 IST2014-09-17T18:49:38+5:302014-09-20T00:36:38+5:30

बेल्ट रेसलिंग स्पर्धेत भगुर, नांदगावच्या खेळाडूंचे वर्चस्व

Bhagur, Nandgaon players dominate in Belt Wrestling Championship | बेल्ट रेसलिंग स्पर्धेत भगुर, नांदगावच्या खेळाडूंचे वर्चस्व

बेल्ट रेसलिंग स्पर्धेत भगुर, नांदगावच्या खेळाडूंचे वर्चस्व



नाशिक - जिल्हा ट्रॅडिशन रेसलिंग असोसिएशन व बलकवडे व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेच्या चौथीू जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेच्या मैदानावर घेण्यात आली. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा संघ दि.१९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या
स्पर्धेत जिल्ह्यातील २६५ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धा बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, ततर कुरेश खपसाकाय, कुस्तीचैके या प्रकारात ७,११,१२.१७ व १९ वर्षाखालील व १९ वर्षावरील वयोगटात घेण्यात आल्या. बलकवडे व्यायामशाळा संघाने प्रथम क्रमांकांचे पारितोषीक मिळविले. ३० सुवर्ण, १३ रौप्य व १२ कांस्य पदके मिळवुन बलकवडे व्यायामशाळा संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळविले. तसेच नांदगाव ट्रॅडीशनल रेसलिंग असोसिएशनच्या संघाने २१ सुवर्ण, १४ रौप्य व १६ कांस्य पदके मिळविली आहे. एस.के.डीइंटरनॅशनल देवळा व १३ सुवर्ण ,१४रौप्य, व १२ कांस्य पदके मिळवुन जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव ता. मालेगाव या संघानी द्वितीय क्रमाकांचे पारितोषीक मिळविले. तसेच ९ सुवर्ण,७ रौप्य व ५ कांस्य पदके मिळवुन युनिवर्सल मार्शल आर्टस असोसिएशन ,नाशिकरोड व ६सुवर्ण ,४रौप्य व ५ कांस्य पदके प्राप्त करत त्र्यंबकेश्वर तालुका ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनला तृतीय क्रमाकांचे पारितोषीक मिळविले. संतोष देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल बलकवडे, अजित शिंदे, प्रशांत आहेर, इम्रान पठाण ,संकेत चंद्रमोरे, राजेश होळस, खंडेराव घुगे, शांताराम बागूल आदी प्रशिक्षकांनी पंच म्हणून काम केले.

Web Title: Bhagur, Nandgaon players dominate in Belt Wrestling Championship