शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजीगणेशोत्सवात सुरक्षिततेसाठी सतर्क ता बाळगा

By admin | Updated: September 1, 2016 01:16 IST

नियोजन बैठक : महापौरांचे गणपती मंडळांना आवाहन;

नाशिक : महानगरपालिका या गणेशोत्सवात मंडळांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविणार असून, गणपती उत्सव मंडळांनी शांततापूर्ण मार्गाने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बोलावलेल्या शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक संजय चव्हाण, राहुल दिवे, वत्सला खैरे, कविता कर्डक, तानाजी जायभावे, हरिभाऊ फडोळ, राजेंद्र महाले, प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक नम्रता देसाई आदि उपस्थित होते. महापौर म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम मंडळांनी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दर्शनरांग व मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅ मेरे बसवून गर्दीवर नियंत्रण ठेवावे. पोलीस यंत्रणेवरील सुरक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळांनी पोलीसमित्र म्हणून भूमिका पार पाडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी गणेशोत्सव मंडळांनी उत्सव काळात शहरातील पथदीप लवकर सुरू करून उशिरा बंद करण्याची मागणी केली. तसेच निर्माल्य व्यवस्थापन, अखंडित वीजपुरवठा, मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावे, लोंबकळत्या विद्युत तारा भूमिगत कराव्या, अतिक्रमण हटवावे तसेच पाणीकपात रद्द करून शहरात स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करावा आदि मागण्या गणपती मंडळांनी महापौरांसमोर मांडल्या. त्यावर महापालिकेकडून मंडळांच्या सर्व मागण्या गांभीर्याने घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महापौर मुर्तडक यांनी दिले. बैठकीसाठी विविध गणपती मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)