शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:45 IST

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात पीडिताला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची भीती दाखवून लाखो रुपये स्वीकारत असे. ए

भोंदू अशोक खरात पीडिताला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची भीती दाखवून लाखो रुपये स्वीकारत असे. एवढेच नव्हे तर त्याने मिरगाव येथील १५ ते २० लाखांची जमीन अशाच प्रकारे कवडीमोल भावात नावावर करून घेतल्याची चर्चा आहे.

एसआयटीच्या तपासात खरातकडून होत असलेल्या फसवणुकीचे अनेक फंडे बाहेर पडत असून त्यामुळे अधिकारीदेखील चक्रावले आहेत. मिरगाव (ता. सिन्नर) येथील एका कुटुंबाची १६ लाखांची जमीन अल्प किमतीत घेण्यासाठी खरातने संबंधित कुटुंबाकडे तगादा लावला. तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात कुटुंबात वाईट घटना घडेल, अशी भीती घातली. 

भोंदू खरातने पुण्यात मुलीच्या नावे १ कोटी ३० लाखांचा घेतला फ्लॅट; कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघड

याच दरम्यान कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू झाला. याचा गैरफायदा घेत खरातने, जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती दाखवत हवी असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करून घेतली. याच जमिनीवर ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केल्याची बाब समोर आली आहे.

गुप्तधनाचा मोह, प्रगतीची आस; संकटातून बाहेर पडण्यासाठी महिला भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात

जमीन व्यवहारप्रकरणी दोन डॉक्टरांची चौकशी

जमिनीच्च्या अनेक व्यवहारांमध्ये खरातसोबत असणाऱ्या शहरातील दोन डॉक्टरांची एसआयटी पथकाने चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात एका डॉक्टरचे राजकीय कनेक्शन सांगितलं जात आहे. दोन ते तीन जमिनीच्या व्यवहारात हे डॉक्टर सोबत होते.

भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात

नाशिक शहराला लागून असलेल्या जमिनीच्या व्यवहारप्रकरणी चौकशी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रारंभी भोंदू खरातला गुंगीचे औषध विक्री केल्याप्रकरणी या डॉक्टरांची चौकशी झाल्याचंही समजतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake godman Kharat extorted lakhs, grabbed land through fear.

Web Summary : Ashok Kharat, a fraud, instilled fear of death in a family, extorting lakhs and seizing land for cheap. He exploited a family tragedy to acquire land, building a temple on it. Two doctors are under investigation for related land deals.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातNashikनाशिकPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी