कायदापालनाची जाणीव निर्माण होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:15 AM2021-03-05T04:15:55+5:302021-03-05T04:15:55+5:30

नाशिक फर्स्ट व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन रस्ते वाहतुक व सुरक्षा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु ...

Awareness of law enforcement will be created | कायदापालनाची जाणीव निर्माण होईल

कायदापालनाची जाणीव निर्माण होईल

Next

नाशिक फर्स्ट व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन रस्ते वाहतुक व सुरक्षा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचे औपचारिक उदघाटन गुरुवारी (दि.४) ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, मुंबई नाका येथे करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी वायुनंदन होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर महापालिका आयुक्त कैलास जाधव, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक आयपीएस अस्वती दोरजे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर उपस्थित होते.

यावेळी वायुनदंन म्हणाले, नाशिकचे नागरीक उत्साही आणि नाविन्यपुर्ण गोष्टी आत्मसात करणे ही नाशिककरांची खुबी आहे. त्यामुळे नाशिकची वाहतुक आदर्श वाहतुक ठरावी आणि नाशिककरांनी रस्त्यांवरुन वाहने चालविताना पुर्णपणे वाहतुक नियमांचे पालन करावे, याकरिता मुक्त विद्यापीठाने हा अभ्यासक्रम ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवी उत्तीर्ण असलेली व्यक्ती या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सहा महिन्यांचा कालावधी या अभ्यासक्रमाचा राहणार आहे.

सामाजिक संस्था व प्रशासनाने एकमेकांच्या हातात हात घालून जर एकत्र आले तर नक्कीच एक चांगले कार्य उभे राहू शकते आणि त्याची मदत समाजाला होताना दिसते. एज्युकेशन पार्क त्याचेच एक उदाहरण आहे. नव्याने सुरु होणाऱ्या या प्रबाेधनपर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून महापालिकेतील सर्व वाहनचालकांना प्रशिक्षित करण्यात येईल, यासाठी त्यांना रितसर ऑनलान प्रवेश घेण्याच्या सुचना करण्यात येतील, असे जाधव यावेळी यांनी मनोगतातून सांगितले.

दरम्यान, उपस्थित मान्यवराच्या हस्ते या अभ्याक्रमाच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुक्त विद्यापीठाचे सहयाेगी प्राध्यापक प्रा. डाॅ. प्रका अतकरे यांनी या अभ्याक्रमाबाबत माहिती दिली. नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन सुरेश पटेल यांनी केले आणि आभार मिलिंद जांबाेटकर यांनी मानले.

----इन्फो---

असा आहे, अभ्यासक्रम

*शैक्षणिक पात्रता- आठवी उत्तीर्ण

*ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

* कालावधी - सहा महिने

*परीक्षा- १०० गुणांची

* पाठ्यपुस्तके ऑनलाइन पीडीएफ स्वरुपात

*भाषा : मराठी

---

फोटो क्र : ०४ट्रॅफिक नावाने आर वर

कॅप्शन : रस्ते वाहतुक व सुरक्षा ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण करताना कुलगुरु डॉ. ई.वायुनंदन, मनपा आयुक्त कैलास जाधव. समवेत अभय कुलकर्णी, अस्वती दोरजे, भरत कळसकर.

===Photopath===

040321\04nsk_52_04032021_13.jpg

===Caption===

रस्ते वाहतुक व सुरक्षा ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण करताना कुलगुरु डॉ. ई.वायुनंदन, मनपा आयुक्त कैलास जाधव. समवेत अभय कुलकर्णी, अस्वती दोरजे, भरत कळसकर

Web Title: Awareness of law enforcement will be created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.