‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:27 IST2019-12-10T23:59:18+5:302019-12-11T00:27:18+5:30

हिरा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री हिराबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श माता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. योग आणि संगीत यावर आधारित चर्चासत्र आणि योग आणि संगीताचा सबंध प्रात्यक्षिकाद्वारे योगगुरू प्रज्ञा पाटील आणि संगीत विशारद रेखा महाजन यांनी सादर केले.

 Award of 'Ideal Mother' | ‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान

‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान

नाशिक : हिरा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मातोश्री हिराबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श माता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. योग आणि संगीत यावर आधारित चर्चासत्र आणि योग आणि संगीताचा सबंध प्रात्यक्षिकाद्वारे योगगुरू प्रज्ञा पाटील आणि संगीत विशारद रेखा महाजन यांनी सादर केले. तसेच स्वरसंगम प्रस्तुत हिंदी, मराठी सुमधुर गीतांचा गायन कार्यक्रम सादर करण्यात आला.
गायक राजकुमार मंडलिक, अशोक महाजन, सुखदा महाजन, धनंजय भावसार, विजया माळी, पार्श्वगायिका रेखा महाजन या कलाकारांनी विविध गीते सादर केली. स्वाती बेलदार, सरोजिनी घुमने पाटील, सरस्वती कांबळे, भारती लासूरकर, आशा मोरे या सर्व मातांना आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बि. के. पुष्पा, पांडुरंग सुतार, बाजीराव तिडके, जगन पाटील, शिवाजी महाजन, अशोक महाजन, विलास वाघ आदी उपस्थित होते.

Web Title:  Award of 'Ideal Mother'

टॅग्स :Nashikनाशिक