शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या अधिकारावर नियोजन अधिकाऱ्याची ‘गदा

By admin | Updated: April 28, 2017 01:42 IST

’नाशिक : जिल्हा परिषदेसाठी उपलब्ध करून दिलेल्या २१ कोटींच्या १४२ रस्ते कामांबाबत जिल्हा परिषदेत वाद उफाळून आल्याचे वृत्त आहे

 ’नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाने ३१ मार्चअखेर ‘बचतीच्या’ माध्यमातून जिल्हा परिषदेसाठी उपलब्ध करून दिलेल्या २१ कोटींच्या १४२ रस्ते कामांबाबत जिल्हा परिषदेत वाद उफाळून आल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीची आवश्यकता असताना प्रत्यक्षात बांधकाम विभाग व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी या १४२ रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिलीच कशी, असा प्रश्न आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे. आगामी ११ मेच्या सर्वसाधारण सभेत यावरून वाद होण्याची शक्यता आहे.दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेला नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या या २१ कोटींच्या निधींवर विरोधी पक्षाच्या आमदारांनाच निधीची खैरात वाटप करण्यात आल्याचे ग्रामीण भागातील भाजपाचे एकमेव आमदार डॉ. राहुल अहेर यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच भाजपाच्या आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांनीही याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे कळते. विशेष म्हणजे भाजपाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेला कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला असताना भाजपाच्या बांधकाम सभापती मनीषा रत्नाकर पवार यांच्यासह भाजपाच्या डझनभर सदस्यांना याची सूतराम कल्पना नसल्याने त्यांनी या मंजुरीबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा नियोजन अधिकारी यांनाच जबाबदार धरले आहे. जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या या १४२ रस्त्यांच्या कामांसाठी २१ कोटींची आवश्यकता असताना ३१ मार्चअखेर जिल्हा परिषदेला त्यासाठी १४ कोटी ३० लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे असताना प्रत्यक्षात या ऐनवेळी आलेल्या निधीतील कामांना प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्याने जिल्हा परिषद सदस्यांचे पित्त खवळल्याचे समजते. त्यामुळे आगामी ६ मेच्या स्थायी समितीच्या बैठकीत तसेच ११ मेच्या सर्वसाधारण सभेत या २१ कोटींच्या कामांवरून सभागृहात वादंग उठण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)