शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक संघटनेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:57 IST

मानोरी : राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परीचालकांना आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती आणि किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन १३ दिवसानंतरही मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असून ग्रामपंचायतीचा गावगाडा विस्कळीत झाला असून संगणक परीचालकांचे आंदोलन पोलिस यंत्रणेमार्फत शासनाकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया संगणक परीचालकांकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआरोप : ठोस निर्णय होत नसल्याने नाराजी

मानोरी : राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परीचालकांना आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती आणि किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन १३ दिवसानंतरही मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असून ग्रामपंचायतीचा गावगाडा विस्कळीत झाला असून संगणक परीचालकांचे आंदोलन पोलिस यंत्रणेमार्फत शासनाकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया संगणक परीचालकांकडून देण्यात आली आहे.गेल्या दहा वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करत असलेले संगणक परिचालकांचे न्याय मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन २२ फेब्रुवारी पासून आझाद मैदानावर सुरू आहे. यावेळी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात आली.

मात्र मंत्रांच्या घरी मोर्चा गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत अनेक संगणक परीचालकांना रेल्वे स्थानकावर सोडून दिले तर काही संगणक परीचालकांना पोलिसांकडून मारहाण देखील केल्याचा आरोप संगणक परीचालकांकडून करण्यात येत आहे.         दरम्यान १ मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सूरु असून या अधिवेशनात देखील संगणक परीचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने संगणक परीचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून शासनाने तात्काळ संगणक परीचालकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून न्याय देण्याची मागणी संगणक परिचालक संघटनेकडून केली जात आहे.

टॅग्स :StrikeसंपGovernmentसरकार