Ashok Kharat latest update 2026: 'अशोक खरात आणि कल्पना खरातचे ज्यावेळी लग्न झाले, त्यावेळी कल्पनाच्या घरची आर्थिक परिस्थिती वाईट होती. अशोक खरात आणि कल्पना यांच्या वयात जास्त अंतर असल्याने घरातूनच त्याला सुरुवातीला विरोध होता', असे माहिती पाडळी गावातील ग्रामस्थांनी दिली. सिन्नर तालुक्यातील पाडळी हे गाव कल्पना खरातचे माहेर आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीने या गावातील लोकांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी अशोक खरातच्या लग्नावेळी घडलेले प्रसंग सांगितले.
खरात हळद लावण्यासाठी शर्टच काढत नव्हता
ग्रामस्थ म्हणाले, "अशोक खरातच्या लग्नाला कल्पनाच्या एका भावाचाही विरोध होता. पण, त्यांचं लग्न कसं जमलं, याबद्दल कुणालाच काही माहिती नाही. १०९२-९३ या वर्षात खरातचे लग्न झाले होते."
अशोक खरातच्या अंगावर वार केल्याच्या खुणा
एका ग्रामस्थाने सांगितलं की, "मी त्याल लग्नाला होता. हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. हळद लावण्यासाठी त्याला कपडे काढायला सांगितले. तो शर्ट काढत नव्हता. तो नकार देत होता. काही लोकांनी त्याला आग्रह केला. तेव्हा त्याने शर्ट काढला. तेव्हा अशोक खरातच्या अंगावर वार झाल्याच्या खूणा होत्या."
कल्पना खरात फरार, एसआयटीकडून पाडळीतही चौकशी
कल्पना खरात शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. तिला अटक करण्यासाठी पथक घरी गेले होते, पण तिथे खरातचा मुलगा होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
एसआयटीतील पोलीस अधिकाऱ्यांनी पाडळी गावात जाऊन कल्पना खरातबद्दल चौकशी केली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, कल्पना खरातचा तिच्या माहेरच्यांसोबत १६ वर्षांपासून संपर्कच नव्हता, अशीही माहिती समोर आली आहे.
अशोक खरात हा कल्पना खरातला माहेरी येऊ देत नव्हता. लग्न झाल्यापासून तिने माहेरच्यांशी संपर्क ठेवणे बंद केले होते, असेही नातेवाईकांनी सांगितले.
Web Summary : Locals revealed Ashok Kharat's wedding to Kalpana faced initial family opposition due to their age gap and Kalpana's financial status. During the Haldi ceremony, Kharat hesitated to remove his shirt, revealing old wounds. Kalpana is currently absconding, and police are investigating her connections.
Web Summary : स्थानीय लोगों ने खुलासा किया कि अशोक खरात की शादी में कल्पना की उम्र और आर्थिक स्थिति के कारण परिवार का विरोध था। हल्दी समारोह में, खरात ने शर्ट उतारने में संकोच किया, पुराने घाव दिखे। कल्पना फरार है, पुलिस जांच कर रही है।