ज्ञानाबरोबर कलाही आवश्यक

By Admin | Updated: September 30, 2016 22:55 IST2016-09-30T22:55:09+5:302016-09-30T22:55:43+5:30

किशोर गोसावी : वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

Art also requires knowledge with knowledge | ज्ञानाबरोबर कलाही आवश्यक

ज्ञानाबरोबर कलाही आवश्यक

काकासाहेबनगर : ज्ञान हे बाहेरून आत येते, तर कला ही आतून बाहेर येते. कलेने आयुष्य समृद्ध होते, म्हणून कलेची कास आपण धरली पाहिजे. यासाठी वाचनाची गोडी वाढली पाहिजे. वाचनातून माणूस वाचायला शिकले पाहिजे तरच दर्जेदार साहित्याची निर्मिती होईल, असे मत कवी किशोर गोसावी यांनी व्यक्त केले.
काकासाहेबनगर येथील के. के. वाघ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ‘जगण्यात कलेचं महत्त्व!’ या विषयावर बोलताना गोसावी यांनी आपल्या आशयधन कवितांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एस. शिरसाठ होते. याप्रसंगी शिरसाठ म्हणाले की, मानवी सुख भौतिक सुखावर अवलंबून नसून ते मानसिक सुखावर असते. हे सुख साहित्यातून मिळते. विद्यार्थ्यांनी साहित्य क्षेत्रात नाव कमवावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक प्रा. महेश होळकर यांनी केले. सूत्रसंचालन मालती ढिकले यांनी केले. आभार भारती शिंदे यांनी मानले. यावेळी
योगेश शेळके, स्मिता बनकर, विक्र म जाधव, तुषार बागुल, मनोहर गायकवाड, सविता सावंत, मेघा रायते, मुक्ता मेधने, एजाज शेख, ज्ञानेश्वर गवळी, रेणुका चौधरी, श्रद्धा फिरके आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: Art also requires knowledge with knowledge