शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

दुसरेही कन्यारत्न झाल्याने विवाहितेचा जाळून खून

By admin | Updated: November 18, 2016 00:55 IST

कूपखेड्यातील घटना : पतीला अटक, सासरची मंडळी फरार

जायखेडा : दुसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाली म्हणून बागलाण तालुक्यातील कूपखेडा येथील सोनाली ठाकरे या विवाहितेस सासरच्या मंडळींनी जाळून टाकल्याची घटना समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित पतीला बुधवारी ताब्यात घेण्यात आले असून सासू, दीर व नणंद फरार आहेत.देवळा तालुक्यातील भऊर येथील माहेर असलेल्या सुनीताचा विवाह कूपखेडा येथील शरद ठाकरे याच्याशी झाला होता. त्यांना पहिली मुलगी आहे. वंशाला दिवा हवा म्हणून तेव्हापासून सासरच्या मंडळीने नाके मुरडली होती. पहिली मुलगी झाल्यानंतर पुन्हा अडीच वर्षांच्या कालावधीनंतर मुलगीच झाली. त्यामुळे सासरची मंडळी नाराज होती. या नाराजीमुळेच सोनाली बाळंत झाल्यापासून दोन अडीच महिने माहेरीच होती. त्या मुलीला पाहण्यासाठी किंवा सोनालीला आणण्यासाठी कोणीही भऊर येथे गेले नव्हते. दरम्यान, तिला सासरी नेण्यासाठी तिचा दीर श्यामकांत ठाकरे गेले होते. त्यांनी सोनालीला कूपखेडा येथे आणल्यानंतर चौथ्याच दिवशी तुमची मुलगी आजारी असल्याचे माहेरी कळविण्यात आले. माहेरची मंडळी आल्यावर त्यांना सोनाली जळाल्याने मयत झालेल्या अवस्थेत आढळून आली. (वार्ताहर)