शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

मविप्रची वार्षिक सभा गोंधळामुळे गुंडाळली

By admin | Updated: September 15, 2014 01:36 IST

मविप्रची वार्षिक सभा गोंधळामुळे गुंडाळली

 

नाशिक : वैद्यकीय महाविद्यालयातील १९ लाख रुपयांचा अपहार तसेच सभासदांना बोलू न देण्याच्या कारणावरून जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शतकमहोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा किरकोळ वाद व गोंधळ वगळता शांततेत पार पडली. यावेळी संस्थेच्या विरोधात बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप करीत बाळासाहेब कोल्हे यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तर काही सभासदांची बोलण्याची इच्छा असताना राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळण्यात आली़ गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात मविप्रचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ सरचिटणीस नीलिमा पवार यांनी अहवाल वाचन करताना संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यामध्ये संस्थेच्या ३५३ शाखांमधून एक लाख ९८ हजार ७३१ विद्यार्थी शिक्षण घेत असून, नवीन तीन ठिकाणी आयटीआय सुरू करण्यात येणार आहेत़ संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयाला कै . मालोजीराव मोगल यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला़ गतवर्षी १९६ सभासदांच्या पाल्यांना नोकरी, तर ४४५ पाल्यांना शैक्षणिक प्रवेश दिल्याचे सांगितले. संस्थेची जिल्ह्यात ७८९़११ एकर जमीन असून, मोहाडी येथील ९९ एकरचे साठेखत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संस्थेचे सभासद अ‍ॅड़ संतोष गटकळ यांनी सभासदांना बोलू दिले जात नसल्याचे तसेच गत सभेला आमदार शिरीष कोतवाल यांनी विषय मंजूर म्हणताच विषयांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगताच सभासदांनी एकच गोंधळ केला़ तसेच आमदार कोतवाल यांनी माईकचा ताबा घेऊन बदनाम करू नका, असे गटकळ यांना सुनावले़ यानंतर देवळा येथील सभासद नीलिमा अहेर यांनी कार्यकारिणीवर दोन महिलांना घेण्याची मागणी केली, तर अन्य सभासदांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या लक्षात घेता तेथील शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याची सूचना मांडली असता त्यांचे बोलणे सुरू असतानाच सभासदांनी गोंधळ केला़ सभासद बाळासाहेब कोल्हे यांनी वैद्यकीय रुग्णालयाच्या अपहाराबाबत बोलताच आॅडिटरच्या हे लक्षात कसे आले नाही याबाबत विचारणा केली़ सभासदांच्या प्रश्नांना सरचिटणीस नीलिमा पवार उत्तरे देत असतानाच बाळासाहेब कोल्हे यांनी सभासदांना पाल्यांच्या प्रवेशासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याची तक्रार करताच पवार यांनी मध्ये बोलू नका असे सुनावले़ यावर सभासदांमध्ये बराच गोंधळ झाला, तसेच कोल्हेंचे सभासदत्व रद्द करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला़ यावेळी विषयांचे वाचन करून एकमताने ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सभापती नितीन ठाकरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती नानाजी दळवी, आमदार शिरीष कोतवाल, श्रीराम शेटे, मुरलीधर पाटील, डॉ. विश्राम निकम, डॉ. तुषार शेवाळे, नाना महाले, भरत कापडणीस, भाऊसाहेब खातळे, रवींद्र देवरे, दिलीप मोरे, दिलीप पाटील, अंबादास बनकर, कृष्णाजी भगत, अशोक पिंगळे, नंदू कोर, काशीनाथ टर्ले, विनायकदादा पाटील, रामकृष्ण महाराज लहवितकर, मोठाभाऊ भामरे, नामदेव गिते, अरविंद कारे आदि मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)