...अन् एक एप्रिल झाला सुनासुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 03:21 PM2020-04-01T15:21:20+5:302020-04-01T15:24:35+5:30

नाशिक : १ एप्रिल म्हणजेच जणू जागतिक फसवणूक दिनच! या दिवशी खोटे मॅसेज टाकून फसवून गंमत केली जात असली तरी सध्या कोरोनामुळे देशभरात गांभिर्य आहे. त्यामुळे एप्रिल फुल कराल तर लॉकअपमध्ये जाल असा संदेश पोलीसांनी देताच नाशिकमधील बहुतांशी सोशल मिडीयावर त्याबाबत बुधवारी (दि.१) दक्षता घेतली. व्हॉटस अ‍ॅपवर तर ओन्ली कॅन सेंड अडमिन मेसेज (फक्त अँडमिन मेसेज पाठवू शकतो) मुळे व्हॉट्सअप ग्रुपवर विनाकारण कुठलेही,कोणतेही,कसेही संदेश,छायाचित्र,व्हिडीओ झळकले तर नाहीच परंतु सध्या सुट्यांमुळे सुरू असलेला पोस्टचा मारा थांबला.

... and it was April! | ...अन् एक एप्रिल झाला सुनासुना!

...अन् एक एप्रिल झाला सुनासुना!

Next
ठळक मुद्देपोलीसांचा कारवाईचा इशारा ग्रुप अ‍ॅडमिनने घेतले सर्वाधिकार

नाशिक१ एप्रिल म्हणजेच जणू जागतिक फसवणूक दिनच! या दिवशी खोटे मॅसेज टाकून फसवून गंमत केली जात असली तरी सध्या कोरोनामुळे देशभरात गांभिर्य आहे. त्यामुळे एप्रिल फुल कराल तर लॉकअपमध्ये जाल असा संदेश पोलीसांनी देताच नाशिकमधील बहुतांशी सोशल मिडीयावर त्याबाबत बुधवारी (दि.१) दक्षता घेतली. व्हॉटस अ‍ॅपवर तर ओन्ली कॅन सेंड अडमिन मेसेज (फक्त अँडमिन मेसेज पाठवू शकतो) मुळे व्हॉट्सअप ग्रुपवर विनाकारण कुठलेही,कोणतेही,कसेही संदेश,छायाचित्र,व्हिडीओ झळकले तर नाहीच परंतु सध्या सुट्यांमुळे सुरू असलेला पोस्टचा मारा थांबला. ग्रुप अँडमीन कडून किमान एक दोन दिवस लॉकडाऊन केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कोणतेही धार्मिक सणवार,राष्ट्रीय सण-उत्सव, वाढिदवस, निधनवार्ता,किरकोळ उपक्र म,किंवा राष्ट्रीय आपत्ती असो...त्यांच्याशी कोणाला देणं घेणं नसले तरी सर्रास व्हॉट्सअप ग्रुपवर विनाकारण कुठलेही, कोणतेही,कसेही संदेश,छायाचित्र,व्हिडीओ,शुभेच्छा, श्रद्धांजली अर्पण केली जाते. अन्य ग्रुपवर येणारे मॅसेज किंवा पोस्ट खातरजमा न करता किंवा सत्यता तपासून न पाहता सर्रास पुढे अन्य ग्रुपवर पाठविले जातात. काही लोक स्वत:ला वेगळे काहीतरी समजून आपले मत कायम दुसऱ्यार लादण्याचा प्रयत्न करतात.

१ एप्रिलच्या दिवसाकडे फसवणूकीतून मनोरंजन म्हणून बघितले जाते. सध्या कोरोनामुळे देश चिंताक्रांत आहेत. तसेच कोणत्या अफवा असल्या तरी त्या ख-या मानल्या जाऊ शकतात आणि त्यातून गंभिर समस्या निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा विषय मनावर घेतला आणि खुद्द जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीच कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक गु्रपवर अगोदरच काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मात्र, ३१ च्या रात्रीपासून बहुतांशी व्हॉटस अप गु्रपमध्ये अ‍ॅडमीनने सर्वाधिकार आपल्या ताब्यात घेतला असल्याने बहुतांशी ग्रुपमध्ये लॉकडाऊन झाल्याचे दिसले.

Web Title: ... and it was April!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.