शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटना देशभर उभारणार तीव्र आंदोलन

By admin | Updated: July 22, 2014 00:58 IST

गुणवंत पाटील : पिकांच्या आधारभूत किमतीसाठी लढा

नाशिक : कांद्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना येत असलेल्या अनंत अडचणी व त्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी आॅगस्ट पासून शेतकरी संघटना देशभर तीव्र आंदोलन उभारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रांतीक अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी येथे दिली़हुतात्मा स्मारक येथे जिल्ह्णातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ पाटील म्हणाले, १९८० मध्ये शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केले तशी पार्श्वभूमी आज तयार झाली आहे़ कांदा, साखर निर्यातबंदी, बाजारभावावर नियंत्रण, बाजार समित्यांमध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट, गारपिटीनंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला मदतीच्या नावाखाली शासनाने पुसलेली पाने आणि आता निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थिती यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे़ राज्य तसेच केंद्र शासनही शेतकऱ्यांसाठी काहीच करताना दिसत नाही़ यामुळे कांदा-बटाटा पिकांना जीवनावश्यक वस्तूंमधून वगळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमुक्ती करावी, संपूर्ण वीजदेयक माफी करावी, इंडियन बँकर्स असोसिएशनच्या कर्जमाफ ीविरोधी भूमिकेचा निषेध, कांदा, कापूस, ऊस यासह विविध पिकांना आधारभूत किंमत मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभे करण्यात येणार आहे़ आंदोलनासाठी जिल्हा केंद्र ठरविण्यात आला असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी ४ आॅगस्टला नाशिक येथे येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले़ याप्रसंगी शैलजा देशपांडे, माया पुसदकर, स्मिता गुरव, रामचंद्र पाटील, डॉ़ श्याम आष्टेकर, संतु पाटील झांबरे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, बाबासाहेब गुजर, अ‍ॅड़ विलास देशमाने, हांबरे आदि उपस्थित होते़(प्रतिनिधी)