शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३१ वर्षांनी आला इंद्रदर्शनाचा योग

By admin | Updated: March 31, 2016 23:12 IST

तब्बल ३१ वर्षांनी आला इंद्रदर्शनाचा योग

दत्ता दिघोळे नायगावनिफाड तालुक्यातील चांदोरी येथे गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक झाल्याने उघडे पडलेल्या पेशवेकालीन, पौराणिक हेमाडपंती मंदिरांचे दरवाजे खुले करण्यात आले आहे. तब्बल ३१ वर्षांनी दुर्मीळ इंद्रदेव मंदिर व शिवालय दर्शनाचा योग आल्याने हा पौराणिक शिल्पकलेचा ठेवा पाहण्यासाठी पर्यटक, भाविकांची मोठी गर्दी होत आहे.सध्या सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. दुष्काळातही हिरवागार दिसणारा निफाड तालुक्यालाही यंंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गोदावरीच्या पात्रातील पाणी आटल्याने कायम पाण्याखाली राहणारी अनेक मंदिरे उघडी पडल्याने पर्यटक व भाविकांसाठी पर्वणी ठरत आहे. सायखेडा व चांदोरी या दोन्ही गावांच्या मधून वाहणारी गोदावरी यंदा अनेक वर्षांनंतर पूर्णपणे कोरडीठाक पडल्याने दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. तब्बल ३१ वर्षांनंतर गोदावरी नदीपात्रातील विविध देवतांची प्राचीन मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या इंद्रदेव मंदिरासह हेमाडपंती व इतर पौराणिक मंदिरांवरील कलाकुसर बघून भाविक हरखून जात आहेत.वर्षानुवर्षे पाण्याखाली राहिल्यानंतरही ही मंदिरे अद्याप सुस्थितीत आहेत. मंदिर परिसरात बांधलेले घाट, छोटी भूमिगत मंदिरे, पुरातन मूर्तींचे शिल्प बघण्यासारखी आहेत. या घाटांवर फिरण्यासाठी दगडांचे बांधीव रस्ते, सध्याही पाण्याने भरलेल्या अनेक विहिरी, मंदिरांसमोरील दगडी कलाकुसर बघणाऱ्याच्या तोंडून आपसूक कौतुकाचे बोल बाहेर पडतात. अनेक जुन्या मूर्ती उघड्या पडल्या असून, त्या सुस्थितीत आहेत.वरुणदेवाने दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी सूर्याच्या सांगण्यावरून इंद्राने येथे तप केल्याची अख्ख्यायिका आहे. मंदिरात इंद्राची मूर्ती, बांधीव दगडी घाट, उजव्या सोंडेचा गणपती, शेषनाग, कार्तिक स्वामी व महादेवांचे दोन मंदिरे, लहान-मोठे अनेक शिवलिंग याठिकाणी आढळतात. घाटाच्या मध्यभागी पाण्याने भरलेली विहीर पर्यटकांचे लक्ष वेधून घेते तर भगवान शंकराची भूमिगत मंदिरेही भाविकांना पौराणिकतेची साक्ष देतात.नदीपात्राच्या दोन्ही टोकांपर्यंत दगडाचा बांधीव रस्ता येथील मंदिरे पूर्वीच्या काळी कायमस्वरूपी उघडी राहत असल्याचा पुरावा मानला जातो. १९०७ मध्ये ब्रिटिशांनी नांदूरमधमेश्वर धरण बांधले, त्यावेळी गोदावरीचा प्रवाह बदलून गावाच्या कडेने घेतल्याने हा पौराणिक वास्तूंचा ठेवा पाण्याखाली गेल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून भीषण दुष्काळाने गोदावरीचे पात्र पूर्ण आटल्यानंतरच या मंदिरांचे दर्शन घेण्याचा योग येत आहे. १९८४-८५ नंतर आता ३१ वर्षांनी ही संधी निर्माण झाली आहे. सर्वच मंदिरे काळ्या पाषाणात कोरलेली असून, त्यांची मांडणी व कलाकुसर लक्ष वेधून घेते. मोठ्या कालावधीनंतर उघडी पडलेले दगड, गोटे, शिंपले, शंख पर्यटकांना आकर्षित करताना दिसत आहे. पुरातन आणि देखणी वास्तुकला आणि दुर्मीळ इंद्र मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातील भाविक याठिकाणी हजेरी लावताना दिसत आहेत.