शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांना शहरातील इंग्रजी शाळेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:23 IST

नाशिक: आदिवासी भागात शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नसल्याने या भागातील मुले इंग्रजी शिक्षणात मागे पडतात. उच्च शिक्षणात इंग्रजीचा वापर अधिक होत असल्याने आदिवासी मुलांना इंग्रजी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विभागातर्फे प्रवेशाची योजना राबविली जाते. त्यानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गासाठी आदिवासी मुलांना शहरातील निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

ठळक मुद्देनव्या शाळांचा समावेश : कळवण प्रकल्पातील सात तालुक्यांचा समावेश

नाशिक: आदिवासी भागात शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नसल्याने या भागातील मुले इंग्रजी शिक्षणात मागे पडतात. उच्च शिक्षणात इंग्रजीचा वापर अधिक होत असल्याने आदिवासी मुलांना इंग्रजी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विभागातर्फे प्रवेशाची योजना राबविली जाते. त्यानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गासाठी आदिवासी मुलांना शहरातील निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास माने यांनी प्रवेशाची प्रक्रीया सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. आदिवासी भागात शिक्षणाचा प्रसार होत असला तरी इंग्रजी शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नाहीत. जागातिकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्व वाढत असल्याने अनुसूचित जमातीच्या मुलांना देखील इंग्रजीचे धडे मिळावे यासाठी आदिवासी प्रकल्पाच्या माध्यामतून योजना राबविली जाते. त्यानुसार अनसूचित जमातीच्या विद्यार्थांना शहरातील नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रवेशप्रक्रीया राबविली जाणार आहे.कळवण आदिवासी प्रकल्पांतर्गत कळवण, सुरगाणा, नांदगाव, सटाणा, चांदवड, देवळा, आणि मालेगाव या सात तालुक्यांमधील आदिवासी विद्याथ्य'ांना शहरातील नामांकीत निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतची प्रक्रीया येत्या २६ पासून कळवण प्रकल्पात सुरू होणार आहे. त्यानुसार अनुसूचित जमातीच्या मुलांना इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गात शहरातील शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी लागणारा प्रवेशाचा अर्ज कळवण प्रकल्प कार्यालयातील तळमजल्यावर उपलब्ध करून देण्यात आलो आहे.प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच पुरावे पालकांना सादर करावे लागणार आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशा पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी रहिवासी पुरावा, जन्म तारखेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्रयरेषेखाली असेल तर यादीतील अनुक्रमांक, इतर अनेक कागदपत्रे लागणार असून त्याची माहिती प्रकल्प कार्यलयातून मिळणार आहे.शहरातील निवासी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यंदा नव्याने शाळा नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी काही शाळांकडून मिळणाऱ्या सुविधांबाबतच्या तक्रारी असलयने नव्याने शाळा देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, खासगी शाळांकडून मिळणाऱ्या सुविधांच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने एकलव्य प्रकल्पांतर्गत आदिवासी विभागाच्या अखत्यारितच निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या हालचाली देखील सुरू झाल्याने आदिवासी विभागाच्या इंग्रजी शाळा लवकरच सुरू होण्याीची देखील शक्यता आहे.

 

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी