शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या ७० विद्यार्थ्यांचे अपघात अनुदान मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 20:06 IST

प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत असताना एखाद्या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू वा अपंगत्व आल्यास अशा विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून राबविली जात आहे.

ठळक मुद्दे५० लाखांचा निधी वर्ग : कुटुंबीयांच्या खात्यावर जमा होणार पैसेगेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात जवळपास ८० विद्यार्थ्यांना अशा घटनांना सामोरे

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शालेय जीवनात दुर्घटना घडून मृत्यू वा अपंगत्व आल्यास विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या ७० विद्यार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, त्यापोटी वाटप करावयाचा ५० लाख ८५ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. लवकरच सदरची रक्कम विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या बॅँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत असताना एखाद्या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू वा अपंगत्व आल्यास अशा विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून राबविली जात आहे. त्यात प्रामुख्याने रस्ता अपघात, वीज अंगावर पडणे, शॉक लागणे, सर्पदंश होणे, हिंस्त्र प्राण्याने हल्ला करणे, नैसर्गिक आपत्तीत पाण्यात बुडणे, पुरात वाहून जाण्याच्या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. शाळांच्या पातळीवरून अशा प्रकारचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करून नंतर त्याला मान्यता दिली जाते. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात जवळपास ८० विद्यार्थ्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. त्यात प्राथमिक शिक्षण कार्यालयाकडून ५७ व माध्यमिक शिक्षण कार्यालयाकडील २३ प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. यासंदर्भात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्हास्तरीय समितीची बैठक होऊन त्यात प्राथमिक विभागाचे ४२ व माध्यमिक विभागाचे २८ अशा प्रकारे ७० प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत विद्यार्थ्याच्या शारीरिक हानीवर आर्थिक मदत देण्याची तरतूद असून, त्यात कमीत कमी ३० हजार ते एक लाखापर्यंत अनुदान विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दिली जाते. त्यामुळे या ७० विद्यार्थ्यांसाठी ५० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान अलीकडेच मंजूर करण्यात आले असून, सदरचा निधी शिक्षणाधिकाºयांच्या नावे वर्ग करण्यात आला आहे. सदरचा निधी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद