शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हा बॅँकेला ८७० कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:57 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचे ८७० कोटी रु पये गुरु वारी वर्ग केले आहेत. गत चार महिन्यांपासून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हा निधी असून, एनडीसीसीकडे वर्ग झाला आहे.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचे ८७० कोटी रु पये गुरु वारी वर्ग केले आहेत. गत चार महिन्यांपासून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हा निधी असून, एनडीसीसीकडे वर्ग झाला आहे.या निधीचा विनियोग कसा करावा त्याचे निकष व अटी निश्चित केल्या आहेत. राज्यातील नाशिक, बीड, उस्मानाबाद या जिल्हा बँकांना सहकार विभागाने निधी वर्ग केला. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा निधी ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे वितरीत करता आला नव्हता. त्यामुळे खरीप हंगाम सुरू झाला, मात्र या बँकांकडे रोखता व रोकड दोन्ही नसल्याने पीककर्ज वितरण बंद झाले होते. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता.सहकार विभागाने निधी वर्ग करताना त्याचे वितरण कसे करावे, याचे निकष निश्चित केले आहेत. या निधीचा उपयोग बँकेच्या संचालकांना आपल्या मर्जीतील संस्था, व्यक्तींच्या ठेवी परत करण्यासाठी करता येणार नाही. हा निधी केवळ पीककर्ज वितरणासाठीच करता येणार आहे. त्याबाबत प्राधान्यक्रम निश्चित केल्यावर त्याला मंजुरी घ्यावी लागणार आहे.राज्य शासनाने कृषी कर्ज वितरणासाठी वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र त्याची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नव्हती. नाशिक जिल्हा बंकेला भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात घोषित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेचेही पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने आता ८७० कोटींची निधी वितरीत केला आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी