शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिकेचे ४० कोटींचे नुकसान

By admin | Updated: July 21, 2014 00:56 IST

मालेगाव महापालिकेचे ४० कोटींचे नुकसान

 

मालेगाव : व्यापारी व्यावसायिकांच्या विरोधाबरोबरच मालवाहतूकदारांच्या विरोधाला जुमानून राज्य शासनाने १५ आॅगस्टपासून महापालिकांचे एस्कॉर्ट म्हणजेच मार्गस्थ परवाना शुल्क बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. शासनाने खरोखरीच हा निर्णय घेतल्यास मालेगाव महापालिकेचे सुमारे ४० कोटी रुपयांचे, तर नाशिक महापालिकेचे १५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
गेल्यावर्षी राज्यात मुंबई वगळता सर्वच महापालिकांमधील जकात रद्द करून त्या जागी एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जकात ही पद्धत रद्द झाल्यानंतर नाकेमुक्त करप्रणाली अस्तित्वात यावी, अशी व्यापारी आणि उद्योजकांची अपेक्षा होती.
नाक्यांवर मालवाहतुकीची तपासणी होत नसली तरी नाक्यावरून जाणाऱ्या मालवाहतूकदारांकडून मार्गस्थ परवाना शुल्क वसूल केले जाते. परंतु त्यातही चिरीमिरी
घेण्याचे किंवा पावतीशिवाय कर आकारण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. मालवाहतूकदारांनी दोन दिवसांपूर्वी एस्कॉर्ट रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्याची तयारी केल्यानंतर राज्य शासनाने त्याची दखल घेऊन चर्चा केली. नगरविकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंह यांनी १५ आॅगस्टपासून एस्कॉर्ट रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. तसा निर्णय घेतल्याचे सांगितले
आहे.
एस्कॉर्ट रद्द केल्यास मालेगाव महापालिकेला सुमारे ४० कोटी तर नाशिक महापालिकेला १५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. मालेगावमार्गे अन्य शहरांत जाणाऱ्या मालवाहतूकदारांकडून महापालिका २०० रुपये प्रतिवाहन मार्गस्थ परवाना शुल्क तर नाशिक महापालिका नाशिकमार्गे अन्य शहरांत जाणाऱ्या मालवाहतूकदारांकडून शंभर रुपये आकारते. हे शुल्क रद्द केल्यास दोन्ही महापालिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. आधीच जकातीऐवजी एलबीटी लागू करण्यात आल्याने महापालिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे.
आता हा नव्याने फटका बसणार असून, त्यामुळे पालिका चिंताक्रांत झाल्या आहेत. अर्थात, यासंदर्भात महापालिकेला अधिकृतरीत्या कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे एलबीटी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)