देवळाली कॅम्पला ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

By Admin | Updated: April 8, 2017 16:55 IST2017-04-08T16:55:29+5:302017-04-08T16:55:29+5:30

देवळाली कॅम्पला ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

4 lakh jewelery stolen from Deolali Camp | देवळाली कॅम्पला ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

देवळाली कॅम्पला ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : दुपारच्या सुमारास घरात एकटी मुलगी असल्याचा गैरफायदा घेत एका चोरट्याने पंधरा तोळे सोने व बारा तोळे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़७) भगूरमधील राजवाड्यात घडली़
मीना मदन लोखंडे (२८, रा़ नवीन वसाहत, राजवाडा, आंबेडकर चौक, भगूर) यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी एकटीच घरी होती़ या गोष्टीचा फायदा घेऊन ३५ ते ४० वर्षीय चोरट्याने घरात प्रवेश केला़ या चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून ३ लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीचे तब्बल पंधरा तोळे सोने व बारा तोळे चांदीचे दागिने चोरून नेले़ या दागिन्यांमध्ये सोन्याच्या ९ तोळ्याची मोहनमाळ, तीन तोळ्याच्या अंगठ्या, तीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, सात तोळे वजनाची चांदीची देवीची मूर्ती, पाच तोळे वजनाचे चांदीचे पैंजण या दागिन्यांचा समावेश आहे़
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 4 lakh jewelery stolen from Deolali Camp