शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

२८ खत परवाने विक्री बंदचे आदेश

By admin | Updated: July 21, 2016 01:13 IST

साडेनऊ लाखांचे बियाणे जप्त

नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर खते व बियाणे मिळावे व बोगस बियाणे व खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या भरारी पथकांना विविध ठिकाणी छापे टाकून २८ केंद्रांना खते व बियाणे विक्री बंदचे आदेश दिले आहेत. तसेच अनधिकृत आढळल्याने ९ लाख ५७ हजार रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.जिल्ह्णात खरिपाचे ६ लाख ५२ हजार २५७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात जिल्ह्णासाठी रासायनिक खतांमध्ये २ लाख ६५ हजार ५०० मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यात शासनाने २ लाख ११ हजार ५०० मेट्रिक टन खतांचे आवंटन जिल्ह्णासाठी मंजूर केले. जुलै २०१६ अखेर मंजूर १ लाख ३५ हजार मेट्रिक टन खतापैकी २० जुलै अखेर १ लाख २४ हजार ७८२ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. जिल्ह्णात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठा मिळण्याकरिता व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या भरारी पथकामार्फत जिल्ह्णातील १०२४ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. तसेच आतापर्यंत ३२० बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. विक्री केंद्रांत त्रुटी आढळून आल्याने २८ ठिकाणी विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहे. तसेच अनधिकृत बियाणे आढळल्याने ९ लाख ५७ हजार ४०५ रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)