शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

वीस लाखांत बसवा प्रभागातील कामे

By admin | Updated: January 16, 2015 23:57 IST

नगरसेवकांना सूचना : आवश्यक कामांना देणार प्राधान्य

नाशिक : महापालिकेच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे आयुक्तांनी प्रभागातील आवश्यक कामांनाच प्राधान्य देण्याचा पवित्रा घेतला असतानाच आता नगरसेवक निधीची मर्यादा केवळ २० लाख रुपयेच निश्चित करत त्यातच प्रभागातील अत्यावश्यक कामे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काहीच कामे होत नसल्याची आणि दोन लाखांच्या कामांच्या फाईलीही निघत नसल्याची नगरसेवकांमध्ये होत असलेली ओरड थांबविण्यासाठीच आयुक्तांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ९० लाख रुपये नगरसेवक निधी निश्चित केला होता. त्यात दहा लाखाने वाढ करत महासभेने नगरसेवक निधी एक कोटी रुपये केला होता. त्यामुळे नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रभागात कामांसाठी कोटी रुपये निधी मिळणार असल्याने नगरसेवकांनी अनेक कामे सुचविली होती. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती, वाढता स्पील ओव्हर लक्षात घेता संजय खंदारे यांनी आयुक्तपदाच्या कारकीर्दीत नगरसेवक निधी ३० लाखांवर आणला होता. तरीही नगरसेवकांची ओरड कायम होती. दरम्यान, डॉ. प्रवीण गेडाम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक कामांना फाटा देण्याचा निर्णय घेतला. अनेक फाईली त्यांनी माघारी पाठवत कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे आदेश त्या-त्या विभागाला दिले. त्यानुसार विभागप्रमुखांनी कामांच्या याद्या आयुक्तांकडे सादर केल्या. प्रभागात कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढत जाऊन नगरसेवकांमध्ये असंतोष पसरला. स्थायी समिती, महासभेतही त्याचे पडसाद उमटले. स्थायी समितीने तर मागील सभेत सदस्यांची दोन लाखांची किरकोळ कामे होत नाही, आणि कोट्यवधींचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्रशासन मंजुरीसाठी ठेवत असल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. त्यातूनच सिंहस्थाचे भूसंपादनाचे प्रस्तावही स्थायी समितीने फेटाळून लावले होते. नगरसेवकांची ओरड लक्षात घेता आयुक्तांनी आता सुधारित अंदाजपत्रक तयार करताना नगरसेवक निधी २० लाखांवर आणला असून, त्यातच प्रभागातील आवश्यक ती कामे सुचविण्याचे आवाहन नगरसेवकांना केले असल्याचे समजते. अंदाजपत्रकानुसार बांधकाम, पाणीपुरवठा विभागातील तरतूद कधीच संपली असून, ज्या विभागातील कामांवर खर्चच झालेला नाही तो निधी या विभागातील कामांकडे वळविण्याचा विचार सुरू आहे. नगरसेवकांनी दिलेल्या फाईलींमधून अत्यावश्यक कामांची निवड केल्यास प्राधान्यक्रमानुसार कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र, कार्यादेश झालेल्या की निविदा प्रक्रियेत असलेल्या फाईलींना प्राधान्य दिले जाणार, याबाबत स्पष्टता नसल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रम कायम आहे. (प्रतिनिधी)