पोर्टलवर १०३ बळींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:35 IST2021-06-18T01:34:24+5:302021-06-18T01:35:46+5:30

आठवडाभरापासून सुरू असलेल्या कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम गुरुवारीही (दि. १७) सुरूच राहिल्याने, दिवसभरात एकूण १०३ बळींची नोंद झाली आहे.

103 victims registered on the portal | पोर्टलवर १०३ बळींची नोंद

पोर्टलवर १०३ बळींची नोंद

नाशिक : आठवडाभरापासून सुरू असलेल्या कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम गुरुवारीही (दि. १७) सुरूच राहिल्याने, दिवसभरात एकूण १०३ बळींची नोंद झाली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील ८०, तर नाशिक ग्रामीणमधील २२ आणि मालेगाव मनपाच्या एका बळीचा समावेश आहे.
गुरुवारच्या एका दिवसात एकूण चार नागरिकांचे बळी गेले असून, त्यात तीन नाशिक ग्रामीणचे तर एक नाशिक मनपा क्षेत्रातील आहे. कोरोना मृत्यूच्या नोंदी दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारपर्यंत बळींची संख्या अंतिमरीत्या अपडेट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष बळी आणि पोर्टलवरील बळींच्या संख्येत दिसणारी तफावत भरून काढण्यासाठी गुरुवारपासून पोर्टलवर बळींची संख्या अपडेट करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या अपडेट बळींमुळे एकूण बळींची संख्या ७२३५वर पोहोचली आहे. 

Web Title: 103 victims registered on the portal