जि.प., पं.स. रिक्त जागांच्या निवडणुकीकरीता ५ एप्रिल रोजी मतदारयादी प्रसिद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:19+5:302021-03-19T04:29:19+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागा ४ मार्चपासून रिक्त झाल्याचे आदेश ...

Z.P., P.S. Voter list will be published on April 5 for the vacant seats | जि.प., पं.स. रिक्त जागांच्या निवडणुकीकरीता ५ एप्रिल रोजी मतदारयादी प्रसिद्ध होणार

जि.प., पं.स. रिक्त जागांच्या निवडणुकीकरीता ५ एप्रिल रोजी मतदारयादी प्रसिद्ध होणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागा ४ मार्चपासून रिक्त झाल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या रिक्त पदांच्या पोटनिडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रमही देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय विभाजित केल्यानंतर ५ एप्रिल रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १२ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर छापील मतदार याद्या २० एप्रिल रोजी अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ एप्रिल रोजी प्रसिद्ध केल्या जातील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

Web Title: Z.P., P.S. Voter list will be published on April 5 for the vacant seats