शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची निवडणूक आठवडाभरात जाहिर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे आगामी विधानसभा निवडणूकीच्या राजकारणाची समीकरणे सुरु असतानाच अचानक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जिल्हा परिषद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे आगामी विधानसभा निवडणूकीच्या राजकारणाची समीकरणे सुरु असतानाच अचानक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचीही लगबग सुरु झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वतरुळात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आह़े दरम्यान वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार आठवडय़ाभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता वर्तवली जात आह़े  नंदुरबारसह धुळे, अकोला व वाशिम या चारही जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिका:यांची मुदत सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाली आह़े या निवडणूकांसाठी गट-गणांची रचना तथा आरक्षणाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आह़े मतदार याद्या व त्यावरील हरकतींचे कामही पूर्ण झाले आह़े तथापि आरक्षणाच्या मुद्यावर काही कार्यकर्ते न्यायालयात गेल्याने निवडणूकांना स्थगिती मिळाली होती़ त्यानंतर राज्यशासनाने या मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक नेमण्याऐवजी विद्यमान पदाधिका:यांनाच मुदतवाढ दिली होती़ एकवेळा मुदत संपल्यानंतर पुन्हा दुस:यांदा मुदतवाढ देण्यात आली होती़ तथापि धडगाव पंचायत समितीच्या एका हरकती संदर्भात येथील कार्यकर्ता थेट सर्वोच्च न्यायालयार्पयत गेल्याने ही बाब सर्वोच्च न्यायालयासमोर आली़ त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यशासनाला मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर तातडीने प्रशासक नेमावे लागल़े त्याचबरोबर 30 दिवसाच्या आत निवडणूकाही घ्याव्या लागणार आहेत़ त्यादृष्टीने प्रशासनाने प्राथमिक तयारी सुरु केली आह़े राज्य निवडणूक आयोगानेही निवडणूक घेण्यासंदर्भात तयारी सुरु केल्याचे बोलले जात आह़े यासंदर्भात सूत्रांशी संपर्क साधले असता त्यांनी येत्या आठ ते 10 दिवसाच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता बोलून दाखवली आह़े सध्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीबाबत राजकीय हालचाली पूर्णपणे थांबल्या होत्या़ सर्वानाच विधानसभा निवडणूकीनंतर या निवडणूका होतील असे वाटत होत़े परंतू अचानक सर्वोच्च न्यायालयाचा आदेशामुळे निवडणूका लवकरच होणार असल्याने सर्वच गोंधळलेल्या अवस्थेत आहेत़ एकीकडे विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी इच्छुक असलेल्या दुस:या फळीतील कार्यकत्र्याची मात्र चांगलीच गोची झाली आह़े जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसची सत्ता असून विरोधी गटात सर्वाधिक संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आह़े परंतू राजकारणाच्या ध्रुवीकरणात आता कोण कुठल्या पक्षाकडे राहतील याचीच चर्चा आहे तर नवीन इच्छुक कार्यकत्र्यामध्येही कुठल्या पक्षाचा ङोंडा हाती घ्यावा, याबाबत संभ्रम आह़े 

आगामी विधानसभेच्या निवडणूका येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत़ मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30 दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका घ्याव्या लागणार आहेत़ त्यामुळे या निवडणूका विधानसभा निवडणूकीपूर्वीच घ्याव्या लागणार आहेत़ या संदर्भात एका वरिष्ठ अधिका:याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, निवडणूक घेण्यासंदर्भातील सर्व तयारी यापूर्वीच झाली आह़े त्यामुळे केवळ निवडणूक कार्यक्रम जाहिर करुन प्रक्रिया राबवावी लागणार आह़े साधारणत: आठवडाभरात त्यासाठी प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आह़े