कोठार येथील युवकाची वेडाच्या भरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:51 IST2020-07-25T12:51:44+5:302020-07-25T12:51:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावदजवळ चिखली कानडी येथे आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोर बांधून एका विवाहित तरुणाने ...

Young man commits suicide in Kothar | कोठार येथील युवकाची वेडाच्या भरात आत्महत्या

कोठार येथील युवकाची वेडाच्या भरात आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावदजवळ चिखली कानडी येथे आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोर बांधून एका विवाहित तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत म्हसावद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील चिखली कानडी येथे सुनील उखडू चव्हाण यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोर बांधून कोठार, ता.तळोदा येथील १९ वर्षीय विवाहित तरुण रमेश अंबालाल पाडवी याने वेडाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश पाडवी हा आपले मामा सूरसिंग औरस चव्हाण यांच्याकडे आला होता. त्याने वेडाच्या भरात आत्महत्या केली अशी माहिती मयताचे मामा सूरसिंग औरस चव्हाण यांनी दिल्यावरुन म्हसावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. म्हसावद ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामदास पावरा हे करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide in Kothar