कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:25+5:302021-03-07T04:28:25+5:30

दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. येथील केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर, काशीविश्वेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर आदींसह गावातील सर्वच महादेव मंदिरांवर महाशिवरात्रीला ...

Yatra for Mahashivaratri canceled on the backdrop of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द

दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. येथील केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर, काशीविश्वेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर आदींसह गावातील सर्वच महादेव मंदिरांवर महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. तसेच महाशिवरात्रीच्या चार दिवस आधी होणारा राम नाम जप उपक्रमही रद्द झाला आहे. यासाठी हजारो भाविक सद्‌गुरू धर्मशाळेत येतात व मुक्कामी थांबून चार दिवस सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राम नाम जप करतात. या उपक्रमाला संत-महंतांचीही उपस्थिती असते. या यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा व राम नाम जप उपक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सद्‌गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी व केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त रामचंद्र पाटील यांनी दिली. भाविकांनी घरी बसूनच राम नाम जप करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रकाशा येथील महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत पूजचे साहित्य, नारळ, खेळणी, संसारोपयोगी वस्तू, उपहारगृहे आदी व्यावसायिक दुकाने थाटतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द झाल्याने या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

प्रकाशा येथे महाशिवरात्रीच्या चार दिवस आधी राम नाम जप सुरू होतात. त्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे हा उपक्रम रद्द करण्यात आला असून भाविकांनी प्रकाशा येथे न येता घरी बसूनच राम नाम जप करावे.

-मोहन काशिनाथ चौधरी, सदगुरु धर्मशाळा, अध्यक्ष

-रामचंद्र दशरथ पाटील, मुख्य विश्वस्त, केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, प्रकाशा

केदारेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीला दोन दिवस गर्दी असते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविक व व्यापाऱ्यांनी याठिकाणी येऊ नये. यंदा मंदिरावर होणारे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत.

Web Title: Yatra for Mahashivaratri canceled on the backdrop of Corona