लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील बसस्थानकातून गुजरात राज्यातील बसमध्ये चढलेल्या महिलेच्या पर्समधील २ लाख रुपये किमतीचे लंपास झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १़३० वाजता घडली़ घटनेमुळे खळबळ उडाली आहे़ज्योती मदन शिंपी रा़बडोदा ह्या दुपारी दीड वाजता गुजरात राज्यातील बसमध्ये चढत असताना त्यांची पर्स अज्ञात व्यक्तीने लंपास केली़ या पर्समध्ये मंगळसूत्र, गळ्यातील हार पाटल्या व चेन असे सोन्याचे दोन लाख १६ हजार रुपयांचे दागिने होते़ ज्योती शिंपी यांना पर्स न मिळून आल्याने आरडाओरड केली़ परंतू तोवर चोरटा पसार झाला होता़ याबाबत ज्योती शिंपी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}