तळोदा तालुक्यात महिलेस बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 01:14 PM2021-01-22T13:14:40+5:302021-01-22T13:14:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गावातून युवती पळून गेली होती. संबंधितांनी जातीरिवाजाप्रमाणे पंच बसवून हे भांडण मिटविले नाही याचा ...

Woman beaten to death in Taloda taluka | तळोदा तालुक्यात महिलेस बेदम मारहाण

तळोदा तालुक्यात महिलेस बेदम मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गावातून युवती पळून गेली होती. संबंधितांनी जातीरिवाजाप्रमाणे पंच बसवून हे भांडण मिटविले नाही याचा राग येऊन महिलेस व साक्षीदारास कुऱ्हाड, दगड व काठीने बेदम मारहाण व शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देत मोटारसायकलीचे नुकसान केल्याची घटना तालुक्यातील न्यूबन येथे घडली.
पोलीस सूत्रानुसार, तालुक्यातील न्यूबन येथील रंजनाबाई राजू ठाकरे या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातून युवती पळून गेली. याबाबत या महिलेच्या सासऱ्याने जातीरिवाजाप्रमाणे गावात पंच बसवून भांडण मिटविले नाही याचा राग येऊन अजय राजकुमार ठाकरे, राजेश राजकुमार ठाकरे, राजकुमार धरमदास ठाकरे, कृष्णा शिवदास पाडवी, यशवंत जयवंत ठाकरे, जयवंत गुलाब ठाकरे, मनीष रमेश ठाकरे, मोगा जयसिंग ठाकरे (सर्व रा.न्यूबन) यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाठ्याकाठ्या, कुऱ्हाड व दगडाने बेदम मारहाण करुन शिवीगाळ करत दुचाकीचे नुकसान केले. घटनेप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करत आहेत.

Web Title: Woman beaten to death in Taloda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.