वारावादळामुळे आंबा पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST2021-02-20T05:31:47+5:302021-02-20T05:31:47+5:30

१८ रोजी सकाळपासून वातावरण ढगाळ होते. पाऊस होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी वेगाने वारे वाहू ...

Wind damage to mango crop | वारावादळामुळे आंबा पिकाचे नुकसान

वारावादळामुळे आंबा पिकाचे नुकसान

१८ रोजी सकाळपासून वातावरण ढगाळ होते. पाऊस होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी वेगाने वारे वाहू लागल्याने परिसरातील आमराई तसेच शेत बांध व घरांभाेवतालच्या आंब्यांवरून मोहर तसेच कैऱ्या खाली पडल्या. यामुळे आंबा उत्पादनात माेठी घट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकंदरीत परिसरातील आंब्याना चांगलाच मोहर आला असल्याने आंबा हंगाम चांगला जाईल, असे उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत होते. परंतु वादळी वाऱ्यांनी मोठे नुकसान केल्याने आंबा उत्पादनात घट होणार आहे.

परिसरात आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून वेळोवेळी आंब्यांना पाणी देणे, सेंद्रिय खते, कीटकनाशक फवारणी ही कामे केली जातात. आंबा पिकाची योग्य प्रकारे निगा राखूनही वेगवान वाऱ्यामुळे कोवळ्या कैऱ्या उन्मळून पडल्याने त्या मातीमाेल ठरल्या आहेत.

गहू पीकही आडवे

रांझणीसह परिसरात परिपक्व होत असलेले गहू पीक वेगवान वाऱ्यामुळे आडवे पडल्याने शेतकरींना फटका बसणार आहे.

Web Title: Wind damage to mango crop