शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची आर्त हाक कधी प्रशासनाच्या कानी पडेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

डेब्रामाळसह परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी जवळपास १५० किलोमीटर अंतर पायी चढ-उतार करून मध्यवर्ती ठिकाण असलेले मोलगी गाठून अक्कलकुव्याला ...

डेब्रामाळसह परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी जवळपास १५० किलोमीटर अंतर पायी चढ-उतार करून मध्यवर्ती ठिकाण असलेले मोलगी गाठून अक्कलकुव्याला यावे लागते. हा प्रवास एका दिवसात करणे शक्यच नाही म्हणून विकास नावाची संकल्पना आणि विकास-विकास म्हणून दिंडोरा पिटणाऱ्या प्रशासनाने या भागातील विकास पाहिलाच पाहिजे. डेब्रामाळ ग्रामपंचायतीतील ही पाच गावं नंदुरबार जिल्ह्यातील टोकाची असून, या ठिकाणी विकास नावाची कोणतीही संकल्पना येथे दिसत नाही म्हणून या गावातील लोकांनाही वाटते की, आपल्या गावात एसटी बस आली पाहिजे. शाळा, अंगणवाडी, रेशनचे धान्य आपल्याला आपल्या गावातच मिळाले पाहिजे, आरोग्याच्या सोयी झाल्या पाहिजे. आपणही विकासाच्या कव्हरेज एरियात आले पाहिजे, अशी ही विकासाची आर्त हाक त्यांच्या मागण्यातून जाणवत होती. देशात विकासाच्या नावाने मोठा गाजावाजा करत मोठ-मोठ्या घोषणा केल्या जातात; पण वास्तवात तसे दुर्गम भागासाठी काहीच होत नाही. आजही स्थलांतर, पुनर्वसन, कुपोषण, आरोग्य या सारखे प्रश्न आजही ताजे आहेत.

या वेळी आंदोलकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी तीन किलोमीटर अंतर पायी चालत केली. रस्ता कामासाठी किती मटेरियल वापरले जाते हे दाखविण्यात आले.

या वळणावर असलेला भाग आणि खडीकरण मिनी बस येण्यास योग्य असेल अशा पद्धतीने करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्युतीकरणासाठी पाच दिवसात नवीन सर्व्हे करून वंचित गावांना लवकरात लवकर विद्युत पुरवठा करण्यासाठीचा पाठपुरावा करणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गावठाण, स्मशानभूमी व गुरचरण क्षेत्रासाठीची मोजणी प्रक्रिया लवकरच करणार असल्याचे आश्वासन ही अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. १ मार्चपर्यंत सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याने बेमुदत आंदोलन व चूल बंद आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले. १ मार्चपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे आंदोलन प्रतिनिधीकडून सांगण्यात आले.

या आंदोलनाच्या प्रति मुख्यमंत्री, खाजदार डॉ. हीना गावीत, आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी, बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकरी अधिकार, नंदुरबार, पोलीस निरीक्षक मोलगी पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहे.

या आंदोलनात पलासखोब्रा, वेलखेडी, सांबर, डेब्रामाळ येथील कार्यकर्ते आणि मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी व आपसिंग वसावे उपस्थित होते.