जिल्हा परिषदेत दोघांची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:32 IST2019-12-19T11:32:24+5:302019-12-19T11:32:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खाजगी बँकेकडून आल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे क्रेडीट संदर्भातील अर्ज भरुन घेणाºया दोघांना कर्मचाऱ्यांनी ...

Washing of the two in the Zilla Parishad | जिल्हा परिषदेत दोघांची धुलाई

जिल्हा परिषदेत दोघांची धुलाई


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खाजगी बँकेकडून आल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे क्रेडीट संदर्भातील अर्ज भरुन घेणाºया दोघांना कर्मचाऱ्यांनी संशयावरुन चोप देत पोलीसांच्या स्वाधीन केले़ दोघेही नागपूर येथील रहिवासी असून बँकेचे ओळखपत्र नसल्याने त्यांना ‘मार’ पडल्याची माहिती समोर आली आहे़
जिल्हा परिषदेत बुधवारी सकाळी ११ वाजता आयसीआयसी बँकेतून आल्याचे सांगून दोघांनी प्रवेश करत कर्मचाºयांसोबत क्रेडीट कार्डसंबधी बोलणी करुन त्यांच्या वैयक्तिक माहितीचे अर्ज भरुन घेत होते़ दरम्यान एका कर्मचाºयाने आयसीआयीआय बँकेच्या नंदुरबार शाखेत फोन लावून क्रेडीट कार्डसाठी दोघांना पाठवल्याची विचारणा केली, परंतू संबधितांनी नकार दिल्यानंतर कर्मचाºयांनी दोघांची चौकशी सुरु केली़ यादरम्यान काहींनी तोतये असल्याचा संशय घेत दोघांची धुलाई सुरु केली़ उमेश्वर बळीरामजी मंडपे रा़ छिंदवाडा रोड नागपूर व आकाशकुमार जगन्नाथ विश्वकर्मा रा़ शिवाजी नगर, वडघाम नागपूर अशी दोघांची नावे आहेत़ दोघांना मारहाण सुरु असताना कर्मचाºयांनी पोलीसांनी बोलावून घेत त्यांच्या ताब्यात देण्यात आले़ शहर पोलीस ठाण्यात त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु केली होती़ दोघांकडे आयसीआयसीआय बँकेशी संबधित कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांच्यावर संशय बळावला होता़ परंतू आयसीआयसीआय बँकेच्या नागपूर येथील ब्रँचने दोघेही कर्मचारी असल्याचे माहिती दिल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला़ दोघांना पोलीसांनी सोडून दिले आहे़ दोघांनी स्थानिक शाखेत न कळवताच जिल्हा परिषदेत अर्ज भरण्यास सुरुवात केल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे़

Web Title: Washing of the two in the Zilla Parishad