शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्ती होत नसल्याने मतदानावर बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परिवर्धे : शहादा ते बोरद रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच वर्षापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धे : शहादा ते बोरद रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच वर्षापासून मागणी होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाकडून कुठलीही दखल घेत जात नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून आगामी निवडणुकांसाठी होणा:या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.शहादा-बोरद रस्ता दुरवस्थेमुळे अरुंद झाला असून दोन वाहने पास होत नाही. या रस्त्याच्या साईडपट्टय़ांवर काळी माती टाकून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर वाहन चालविताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन अनेक जण जायबंदी झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. त:हाडी ते परिवर्धा दरम्यानचा रस्ता तर फारच खराब झाला आहे. मागील पाच वर्षापासून या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी एकदाही भेट दिली नसल्याने आपले लोकप्रतिनिधी  हरवल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या रस्त्याबाबत पाच वर्षापासून नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकांच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा त:हाडी,  परिवर्धेसह परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातही वाढले आहेत.