शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार वनपट्टेधारकांना सातबाऱ्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील साधारण चार हजार वनपट्टेधारक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून सातबाऱ्यांची प्रतिक्षा लागून असून, यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील साधारण चार हजार वनपट्टेधारक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून सातबाऱ्यांची प्रतिक्षा लागून असून, यासाठी ते स्थानिक महसूल प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना दाद दिली जात नसल्याची त्यांची व्यथा आहे. निदान जिल्हाधिकाºयांनी तरी त्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर फुंकर घालून मार्गी लावावा, अशी त्याची अपेक्षा आहे.तळोदा तालुक्यातील लक्कडकोट, गढीकोठडा, रापापूर, चौगांव खुर्द, वाल्हेरी, माळखुर्द, मनीबेली, केलवापाणी, रावलापाणी, कोठार, बंधारा, अलवान, राणीपूर, वरपाडा, तयाचापळा ढेकाटी, सितापावली, सोमावल खुर्द, इच्छागव्हाण, एकधड, धजापाणी, बोरवण, टाकळी आदी सातपुड्यातील गावांमधील वनअतिक्रमणधारक शेतकरी १९८० पासून वनजमीन खेडत होते. गेल्या ३५ वर्षांच्या शासनाविरोधाच्या लढ्यानंतर न्यायालयाचा आदेशाने त्यांना २०१५ मध्ये या जमिनी मिळाल्या. त्यानंतर शासनाने पुढील कार्यवाही केल्यानंतर सदर वन अतिक्रमितांना ताबा पावत्या देण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही प्रशासनाकडून या शेतकºयांना सातबारे देण्यात आलेले नाहीत. सातबाºयांसाठी गेल्या पाच वर्षांपासून सारखे ते स्थानिक महसूल प्रशासनाकडे थेटे घालत आहेत. तुमच्या जमिनीच्या मोजनीबाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच सातबारे मिळतील, असे पोकळ आश्वासन देऊन त्यांची आजतागायत बोळवण केली जात असल्याचे हे शेतकरी सांगतात.वास्तविक सातबारा हा शेतकºयांचा प्रॉपर्टीच्या प्रमुख आरसा असतो. त्यांच्यावरच त्यांची बाजारात पत असते. परनतु त्याच्यासाठी आदिवासी शेतकºयांना महसूल प्रशासनो जंग-जंग पछाडले आहे. हक्काची जमीन असतांना केवळ सातबाºयाअभावी त्यांना शासनाच्या योजनांपासूनदेखील उपेक्षित राहावे लागत आहे. एकीकडे सरकार शेतकºयांचा वाली असलल्याचा डिंडोरा पिटत असते तर दुसरीकडे त्यांचेच प्रशासन त्यांचा जाच करीत असल्याचा आरोप वनपट्टेधारकांनी केला आहे.सरकारनेच आम्हाला जमिनीची ताबा पावती दिली आहे. मग तात्काळ सातबारा का दिला जात नाही असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक महसूल प्रशासनाकडे हेलपाटे मारून अक्षरश: थकलो असून, आता जिल्हा प्रशासनाने तरी यावर तातडीने ठोस कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला तंबी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान गेल्या आठवड्यातही या प्रकरणी तहसीलदारांनी भेट देऊन सातबारे देण्याची मागणी केली होती. त्यांनी आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे शेतकºयांनी सांगितले.

शासनाने ताबा पावती दिली असली तरी सातबारा नसल्यामुळे कोणत्याही बँका कर्ज देण्यास तयार होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला सावकाराची दाढी धरावी लागते. तोही मनमानी अव्वाच्या सव्वा व्याज लावून पैसे देत असतो. इकडे प्रशासन म्हणते ताबा पावतीवरदेखील कर्ज देण्याचा शासनाचा आदेश आहे. परंतु तिकडे बँका म्हणतात तुमच्या जवळ सातबारा नाही तर बँकेचा बोजारा कशावर चढवायचा. बोजा चढविल्याशिवाय पीक कर्जच देणार नाही, असा सज्जड दम दिला जात असल्याचे शेतकरी सांगतात. या दोन्ही यंत्रणांच्या जाचामुळे शेतकरी अक्षरश: वैतागले आहेत. बँकांच्या कर्जाबाबत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व वनपट्टे धारकांचा समन्वय साधून त्यात मार्ग काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.