शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरच्या उपनगराध्यक्षपदी विश्वास बडोगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विश्वास भीमराव बडोगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  उपनगराध्यक्षपदासाठी विश्वास भीमराव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विश्वास भीमराव बडोगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी विश्वास भीमराव बडोगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. मंगळवारी उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी १० ते १२ वाजेच्या कालावधीत विश्वास भीमराव बडोगे यांचे एकमात्र नामनिर्देशनपत्र मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्याकडे दाखल करण्यात आले. यावेळी विश्वास बडोगे यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून गटनेता आशिष फतू मावची व अनुमोदक म्हणून विरोधी पक्षनेता नरेंद्र देवीदास नगराळे यांची सही होती.दुपारी १२ वाजता सभेला प्रारंभ झाला. या सभेत प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. छाननीअंती विश्वास भीमराव बडोगे यांचे उपनगराध्यक्ष पदासाठीचे नामनिर्देशन वैध असल्याचे पीठासीन अधिकारी हेमलता पाटील यांनी जाहीर केले. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी नियमानुसार १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला असता. मुदतीत कोणीही माघार न घेतल्याने नियमानुसार उपनगराध्यक्षपदासाठी विश्वास बडोगे हे नवापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून पुढील कालावधीसाठी निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी जाहीर केले. या विशेष सभेत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानून सभा संपल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरिया यांनी ११ जानेवारी २०२१ रोजी राजीनामा दिलेला होता. नवापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी सभेस दिली होती. त्यानुसार मंगळवारी नवापूर नगर परिषदेच्या वीर एकलव्य सभागृहात पीठासन अधिकारी हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्या उपस्थितीत सकाळी १२ वाजता विशेष सभेला सुरुवात करण्यात आली होती. सभेच्या विशेष सभेत  आशिष मावची, आरीफ बलेसरिया, नरेंद्र नगराळे, हारुण खाटीक, रेणुका गावित, बबिता वसावे, मंजू गावित, विशाल सांगळे, खलील खाटीक, अरुणा पाटील, मिनल लोहार, महेंद्र दुसाणे, सुरय्याबी शाह,  महिमा गावित, सुरेखा जगदाळे, बंटी चंदलाणी, यश अग्रवाल उपस्थित  होते. या निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीय अधिकार अनिल सोनार, वरिष्ठ लिपिक अशोक साबळे यांनी पार पाडली.