शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

गाव तेथे रोपवाटीका करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येत्या वर्षात गाव तेथे रोपवाटीका करण्याचे नियोजन करण्यात येणार असून कृषी, वन विभागाने यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येत्या वर्षात गाव तेथे रोपवाटीका करण्याचे नियोजन करण्यात येणार असून कृषी, वन विभागाने यासाठी संयुक्त प्रयत्न करावा. सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हरित सातपुडा अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी वन विभागाने जिल्ह्यात अधिकाधीक रोपवाटिकेची कामे घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी ए.के. धानापुणे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात रोपाची आवश्यकता असल्याने अभियानांतर्गत पुढील वर्षांपासून जिल्ह्यात गाव तेथे रोपवाटिका हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वनविभागाने रोजगार हमी योजनेतंर्गत रोपवाटीकेची जास्तीत जास्त कामे घ्यावीत. याद्वारे वृक्ष संवर्धनाबरोबरच स्थांनिक लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकेल. शेतकऱ्यांना दिर्घकाळ उत्पन्न देणाºया आंबा, पेरु, सिताफळ, बाबु, आवळा या वृक्षाची रोपवाटिकेत आर्वजुन लागवड करावी. रोपवाटीकेबाबत आदिवासी ग्रामीण भागात स्थानिक भाषेत ग्रामस्थांचे प्रबोधन करावे. त्यांना वृक्ष संवर्धनातून उपलब्ध होणाºया रोजगाराची माहिती देण्यात यावी व अभियानाचे महत्वदेखील सांगण्यात यावे. गाव तेथे रोपवाटीका उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस प्राप्त होणाºया पेसा किंवा १४ व्या वित्त आयोगाचा निधी उपयोगात आणता येईल.ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कमीत कमी ५ रोपवाटीकांची कामे घ्यावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी रोजगार हमी योजनेतंर्गत झालेल्या कामाचा आढावा घेऊन प्रलंबित असलेली कामे त्वरीत करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. याबैठकीस वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.महात्म गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कृषी विभागाची आढावा बैठक डॉ.भारुड यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या सीसीटी, कम्पार्टमेंट बंडींग, फळबाग लागवड, शेततळे, दगडी बांध अशा विविध कामाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. अपूर्ण कामे वरिष्ठाशी सन्मवय साधून त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यात अनाधीकृत खते व बि-बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री होत असल्यास अशा दुकानदारांवर कारवाई करावी, त्यासाठी धडक मोहिम आयोजित करावी. दुकानदारांना दुकानाच्या दर्शनी भागावर दरसूची लावण्याचे निर्देश देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.पी.भागेश्वर, कृषी उपसंचालक आर.एच.महाले यांच्यासह अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.