शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाळी नाक्यावर वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : नंदुरबार जिल्ह्याच्या सिमा जिल्हा प्रशासनाने सील केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून गुजरातेतून येणारी अवजड वाहने गव्हाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : नंदुरबार जिल्ह्याच्या सिमा जिल्हा प्रशासनाने सील केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून गुजरातेतून येणारी अवजड वाहने गव्हाळी चेक नाक्यावर थांबवून ठेवल्याने याठिकाणी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असून, अत्यावश्यक सेवा असणारी वाहने भाजीपाला, दुध, मेडिसिन वगैरे वाहने सोडली जात आहेत.कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने व राज्यशासनाने कर्फ्यु लावल्याने सोमवारी रात्रीपासून राज्याच्या व जिल्ह्याच्या सिमा सील केल्याने एसटी बसेस, खाजगी प्रवासी वाहतुकीची वाहने बंद आहेत. त्याचप्रमाणे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकादेखील थांबविण्यात आले आहेत. परंतु गुजरातेत याची अंमलबजावणी होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रका गव्हाळी चेकनाक्यावर थांबविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.सध्या मोठ्या प्रमाणावर गुजरातेतून मजूर वर्ग आपापल्या गावी परतु लागला असून, मिळेल त्या वाहनाने महाराष्ट्रात दाखल होत आहे. गव्हाळी चेकपोस्टवर आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांकडून त्यांची तपासणी झाल्यानंतरच त्यांना पुढे मार्गस्थ होऊ देत आहेत. त्यामुळे गुजरातेतील लोंढा आपल्या गावी येत असून, आरोग्य यंत्रणेला घरोघरी पोहचून त्यांची माहिती मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. गव्हाळी चेकनाक्यावर आरटीओ अधिकारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी असे पथक कार्यान्वित असून, वाहतुकीवर नियंत्रण ठेवून आहेत.