गव्हाळी नाक्यावर वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:44 IST2020-03-26T12:44:36+5:302020-03-26T12:44:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : नंदुरबार जिल्ह्याच्या सिमा जिल्हा प्रशासनाने सील केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून गुजरातेतून येणारी अवजड वाहने गव्हाळी ...

Vehicles queue at the nasty nose | गव्हाळी नाक्यावर वाहनांच्या रांगा

गव्हाळी नाक्यावर वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : नंदुरबार जिल्ह्याच्या सिमा जिल्हा प्रशासनाने सील केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून गुजरातेतून येणारी अवजड वाहने गव्हाळी चेक नाक्यावर थांबवून ठेवल्याने याठिकाणी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असून, अत्यावश्यक सेवा असणारी वाहने भाजीपाला, दुध, मेडिसिन वगैरे वाहने सोडली जात आहेत.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने व राज्यशासनाने कर्फ्यु लावल्याने सोमवारी रात्रीपासून राज्याच्या व जिल्ह्याच्या सिमा सील केल्याने एसटी बसेस, खाजगी प्रवासी वाहतुकीची वाहने बंद आहेत. त्याचप्रमाणे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकादेखील थांबविण्यात आले आहेत. परंतु गुजरातेत याची अंमलबजावणी होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रका गव्हाळी चेकनाक्यावर थांबविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर गुजरातेतून मजूर वर्ग आपापल्या गावी परतु लागला असून, मिळेल त्या वाहनाने महाराष्ट्रात दाखल होत आहे. गव्हाळी चेकपोस्टवर आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांकडून त्यांची तपासणी झाल्यानंतरच त्यांना पुढे मार्गस्थ होऊ देत आहेत. त्यामुळे गुजरातेतील लोंढा आपल्या गावी येत असून, आरोग्य यंत्रणेला घरोघरी पोहचून त्यांची माहिती मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. गव्हाळी चेकनाक्यावर आरटीओ अधिकारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी असे पथक कार्यान्वित असून, वाहतुकीवर नियंत्रण ठेवून आहेत.

Web Title: Vehicles queue at the nasty nose