भाजपतर्फे ६ जुलैपर्यंत जिल्ह्यात विविध उपक्रम : विजय चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST2021-06-19T04:21:14+5:302021-06-19T04:21:14+5:30

व्यासपीठावर आमदार राजेश पाडवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावित, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष, भाग्यश्री चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना पंड्या, ...

Various activities in the district by BJP till July 6: Vijay Chaudhary | भाजपतर्फे ६ जुलैपर्यंत जिल्ह्यात विविध उपक्रम : विजय चौधरी

भाजपतर्फे ६ जुलैपर्यंत जिल्ह्यात विविध उपक्रम : विजय चौधरी

व्यासपीठावर आमदार राजेश पाडवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावित, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष, भाग्यश्री चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना पंड्या, शानूबाई पाडवी, जिल्हा सचिव हेमलाल मगरे, तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, अनुसूचित मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्निल बैसाने, जिल्हा सहसचिव सपना पाडवी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल शेंडे, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा अनामिका चौधरी, माजी तालुकाध्यक्ष यशवंत पाडवी, जि.प सदस्य भरत पवार, आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले, पक्षाचे प्रेरणास्त्रोत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यात २३ जून ते ६ जुलैपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन आहे. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन योगशिबिर, २३ जून ते ६ जुलै या कालावधीत सर्व बुथवर वृक्षारोपण व तलाव, विहिरी, नदी पात्रात स्वच्छता अभियान, २५ जूनला आणीबाणी काळा दिवस पाळण्यात येणार आहे. २७ जूनला 'मन की बात', तर ७ जुलै रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या बलिदानावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Various activities in the district by BJP till July 6: Vijay Chaudhary