शहाद्यात रंगणार विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:47 IST2019-12-25T12:47:52+5:302019-12-25T12:47:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव (युवारंग) येथील पूज्य साने ...

University-level Yuvaranga Festival, marking the martyrdom | शहाद्यात रंगणार विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सव

शहाद्यात रंगणार विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव (युवारंग) येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात १६ ते २० जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी दिली.
विद्यापीठ प्राधिकरणाच्या धोरणानुसार विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यापीठ संलग्न महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्था, शैक्षणिक प्रशाळा विभागातील नियमित विद्यार्थ्यांसाठी आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना ६ जानेवारी २०२० पावेतो संघ नोंदणी करता येणार आहे. आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंगमध्ये पाच कला प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यात संगीत प्रकारात शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन (ताल वाद्य व सूर वाद्य ), सुगम गायन (भारतीय व पाश्चिमात्य), समूहगीत (भारतीय व पाश्चिमात्य), लोकसंगीत, भारतीय लोकगीतांचा समावेश आहे. नृत्य प्रकारात समूह लोकनृत्य व शास्त्रीय नृत्याचा समावेश असून साहित्य कला या प्रकारात वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन स्पधेर्चा समावेश आहे.नाट्य कला प्रकारात विडंबन नाट्य, मूकनाट्य व मिमिक्री स्पर्धेचा समावेश असून ललीत कला या प्रकारात रांगोळी, चित्रकला, कोलाज व्यंगचित्र, क्ले मॉडलिंग, फोटोग्राफी, इंस्टॉलेशन, मेहंदी या कला प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. युवक महोत्सवात सहभागी सर्व संघामधून सर्वसाधारण विजेत्यास डॉ.जी.डी. बेंडाळे फिरता स्मृती चषक तर उपविजेत्यास कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी फिरता स्मृती चषक देण्यात येईल. युवारंग आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून युवारंग यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समिती गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी दिली.

Web Title: University-level Yuvaranga Festival, marking the martyrdom