शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
3
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
4
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
5
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
6
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
7
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
8
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
10
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
11
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
12
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
13
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
14
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
15
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
16
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
17
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
18
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
19
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
20
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचपाडा येथे दुचाकी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 13:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  तालुक्यातील चिंचपाडा दुरक्षेत्र पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून अवघ्या काही तासांतच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  तालुक्यातील चिंचपाडा दुरक्षेत्र पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून अवघ्या काही तासांतच चोरलेली ४० हजाराची एक मोटरसायकल जप्त केली आहे.हनुमान उर्फ कानिथ उर्फ नवेश चित्त भोसले वय ३२ रा. नवे जामदा ता. साक्री जि. धुळे असे संशयीताचे नाव आहे. चिंचपाडा येथील जितेंद्र बजाज यांची  मोटरसायकल (क्रमांक ३९ एस ९७५७) ५ जानेवारी रोजी रात्री चोरीस गेली होती. संशयीत आरोपी हा  चिंचपाडा परिसरात असल्याची माहिती हवालदार दादाभाई वाघ व त्यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार चिंचपाडा दूरक्षेत्र पोलीस पथकाने आरोपीस मोठ्या शिताफीने मोटरसायकलसह संशयीताला रंगेहात पकडले. त्याच्या जवळील मोटरसायकलीच्या कागदपत्र बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास पथकाने शिताफीने पकडले. त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही जितेंद्र बजाज रा. चिंचपाडा येथील मिशन दवाखान्या जवळील आदर्श कॉलनी या ठिकाणाहून चोरीस गेली असल्याची खात्री झाली. त्याने तळोदा, शहादा, दोंडाईचा, उपनगर नंदुरबार, धुळे जिल्ह्यासह गुजरात राज्यातील बारडोली, वालोड, पलसाणा या ठिकाणी वाहन चोरी व घरफोडी यासारखे विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडा दुरक्षेत्र पोलिस  दादाभाई वाघ, जितेंद्र चव्हाण, सुनिल बर्वे, योगेश तनपुरे यांच्या पथकाने ही कारवाई   केली.