दुभाजकावर कंटेनर आदळून दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:51 IST2020-06-08T11:50:54+5:302020-06-08T11:51:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर गावानजीक असलेल्या दुभाजकावर कंटेनर आदळून अपघात झाल्याची घटना पहाटे चार वाजेच्या ...

Two persons were injured when a container collided with a divider | दुभाजकावर कंटेनर आदळून दोनजण जखमी

दुभाजकावर कंटेनर आदळून दोनजण जखमी


लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर गावानजीक असलेल्या दुभाजकावर कंटेनर आदळून अपघात झाल्याची घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. यात सुदैवाने जीवितहानी टळली, दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
रविवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर (क्रमांक जी.जे १५ वाय. वाय. ७३४१) शहादा कडून खेतीया कडे जात असताना शहादा खेतीया रस्त्यावरील खेडदिगर गावानजीक असलेल्या बाबा लॉज जवळ दुभाजकावर जाऊन आदळली. अपघात घडला त्यात सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातात कंटेनर चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले. जोराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी मदतीसाठी धावले. दुभाजकावर रिफ्लेक्टर नसल्याने अचानक दुभाजक दिसून आला नसल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी घ्याच ठिकाणी एका खाजगी प्रवासी वाहतूक करणारी बस चा अपघात झाला होता त्यावेळेस जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी दिशादर्शक रिफ्लेकटर बसवण्याची मागणी होत आहे.
रस्त्याचे काम करतांना अनेक बाबी सोडून देण्यात आल्या आहेत. त्यात रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे मारणे यासह इतर बाबींचा समावेश आहे. त्यामुळे चालकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्यातून अपघात होतात.


 

Web Title: Two persons were injured when a container collided with a divider