दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:46 IST2020-07-26T12:45:51+5:302020-07-26T12:46:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापूर व शहादा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना घडली. नवापूर ...

Two people were killed in two separate accidents | दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार

दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर व शहादा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना घडली. नवापूर व शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना धुळे-सुरत महमार्गावर चिंचपाडा शिवारात घडली. संजय दगा महाजन (४८) रा.देवगाव, ता.पारोळा हे त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच १९ डीएम २८३७) सोनगड येथे जात होते. चिंचपाडा शिवारात त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली. त्यात त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारे वाहने पसार झाले. श्रीराम महाजन यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात नोंद झाली आहे.
दुसरी घटना मलगाव-मानमोड्या दरम्यान घडली. सुनील जयसिंग पावरा (३०) रा.मोगरा, ता.शहादा यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला. शहादा पोलिसात नोंद झाली आहे.

Web Title: Two people were killed in two separate accidents