शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षानंतर पावणे दोन लाख क्विंटल मिरची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबार बाजारात आतापर्यंत १ लाख ६० हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण झाली आहे़ यंदा मिरचीचे दरांमध्ये तेजी कायम राहिल्याने तसेच निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांकडून मिरची आवक अद्यापही सुरु आहे़ अद्याप महिनाभर हंगाम सुरु राहणार असल्याने दोन वर्षांच्या कालावधीनंतर दोन लाख क्विंटलचा टप्पा सहजरित्या पूर्ण होणार आहे़गेल्या पाच वर्षात वेळोवेळी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे मिरची उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता़ यातून हंगामात किमान तीन लाख क्विंटलपर्यंत होणारी मिरची आवक गेल्या पाच वर्षात निम्म्यावर आली होती़ यातून बाजारातील अर्थकारण डळमळीत शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्यात उदासिनता निर्माण झाली होती़ परंतू गेल्या वर्षात जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या पावसाने दमदार हजेरी दिल्याने मिरची पिकाला जीवदान मिळाले होते़ परिणामी आतापर्यंत मिरची उत्पादन सुरु असल्याचे चित्र नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात असून यामुळे दर दिवशी नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डात २ हजार २०० क्विंटलपर्यंत सरासरी मिरची आवक होत आहे़ हंगाम संपण्यास महिन्याचा कालावधी असल्याने ही आवक दोन लाख क्विंटलच्या पुढे जाण्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे़ मिरचीला मिळालेला बुस्टर इतर व्यवसायांवरही परिणामकारक ठरत असून पावडर तयार करण्यासह परराज्यात निर्यात होणाºया कोरड्या मिरचीलाही चालना मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे़यंदा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर गुजरात राज्यातून मिरचीची आवक बाजारपेठेत होत असल्याने आतापर्यंत तब्बल ५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती आहे़ आगामी काळातही व्यवहार सुरु राहणार असल्याने यंदाचा मिरची हंगाम ७५ ते ८० कोटींपर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे़ यंदा येथील परराज्यातील मिरची आवक मर्यादित असल्याने स्थानिक शेतकºयांच्या मिरचीला प्राधान्य मिळाले आहे़२०१३-२०१४ या वर्षात नंदुरबार बाजार समितीत १ लाख ८ हजार ४०३ क्विंटल मिरची आवक झाली होती़२०१४-२०१५ या वर्षात ९७ हजार ५६९ क्विंटल़२०१५-२०१६ या वर्षात ८९ हजार ८०९ क्विंटल़२०१६-२०१७ या वर्षात २ लाख ६८ हजार क्विंटल़२०१७-२०१८ या वर्षात ६६ हजार ५९४ क्विंटल़२०१८-२०१९ या वर्षात १ लाख ५६ हजार ९८९ क्विंटल मिरची आवक झाली होती़२०१४-१५, २०१५-१६ आणि २०१७-१८ या वर्षात मिरची आवक ही एक लाख क्विंटलचा टप्पाही पूर्ण करु शकली नव्हती़ या वर्षात प्रामुख्याने दुष्काळी स्थिती असल्याने शेतकºयांना लागवडीची अडचण होती़ यात रोपांच्या किमतीत वाढ झाल्याने लागवड खर्च वाढला होता़ परिणामी लागवड क्षेत्र घटून उत्पादनातही मोठी घट आली होती़ यंदा मात्र मिरचीची लागवड अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक असल्याने उत्पन्न वाढले आहे़बाजारात ओल्या मिरचीचे दर हे प्रतिक्विंटल चार हजाराच्या पुढे असल्याने शेतकºयांना दिलासा मिळत आहे़ लाली, व्हीएनआर, शंकेश्वरी या मिरचीची सर्वाधिक खरेदी होत आहे़ मिरची खरेदी विक्रीचे व्यवहार हे बाजारासोबतच पथारींवर सुरु असल्याने तेथील मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातील १५ गावांमधील महिला आणि पुरुष मजूरांना तब्बल चार महिन्यांपासून मिरची हंगामातून रोजगार मिळत आहे़